Skip to main content

अर्पणपत्रिका

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 31/10/2011 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया) शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला जेथे अर्थ प्राप्त झाला अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ जेथून व्युत्पन्न झाला, - - त्या स्वराला अर्पिता मम काव्य ॐ कारा तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी जो धूम्र उत्पन्न झाला, - - त्या धुराला अवकाश जे व्याप्त त्यासही भेदून एकमात्र जो बाण गेला बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल बलाचा उद्गम त्या उद्ग्माला, - - वंदिताना जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा त्याचाहि जो अंतरात्मा तद् भावनेला, - - - - - -
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 982
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

काहीतरी छान आहे एवढेच कळले!! :( निटसे समजले नाही. त्या फटूचा काय संदर्भ लागत नाहीये!!