Skip to main content

कविता

अंगणात एकदा हत्ती आला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 21/10/2011 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात एकदा हत्ती आला
अंगणात एकदा हत्ती आला पाठीवरती बस मला तो म्हणाला ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या मग झाली माझी मज्जाच मज्जा गल्लीतली मुले बघत राहीली खुप सगळी दिसत होती ठेंगणी ठूस ईकडून तिकडे फिर फिर फिरलो इतका की कंटाळ्याने मी थकलो तेव्हढ्यात काही माणसे आली हत्तीला सर्कशीत घेवून गेली - पाषाणभेद १२/१०/२०११

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 21/10/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

पोरका

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 21/10/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तेजाचा तो पुत्र पोरका उन्मुक्तीच्या रचतो गाथा त्या असूयेने असह्य होता विव्हळते मग जग आता -- युयुत्सु

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस