Skip to main content

कविता

दोनुली-नदीचा काठ

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली- पायवाट

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली - प्रश्न

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

शाप आदीमायाशक्तीचा......!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 04/11/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
शाप आदीमायाशक्तीचा......!

नाकतोंडात नळ्या घुसल्यावर
ती कासावीस झाली
रसायनाचा मार, हवेचा दाब
श्वास गुदमरला.....
प्राण निघायला लागला...
प्राण डोळ्यापर्यंत पोचताच
तिने पापण्या घट्ट मिटल्या
प्राण अडवला, मुठी आवळल्या
तोच तोंडातून शब्द फुटलेत
देवा! ..... वाचव रे देवा!!
दुसर्‍याच क्षणी संचारली तिच्यात
आदी-माया-शक्ती
गर्भाबाहेर आली.... आणि
कडाडली... वीज होऊन....!

"बाबा! का संपवलंत तुम्ही मला

स्वगत

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 03/11/2011 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत विरघळलेल्या आशेमधून माझ्यातलं मी पण उठून उभ राहिलं-मला म्हणालं असच जाउ देते मला तळहातावर घेउन बघ तळहातांवरच्या रेषांमधून माझ प्राक्तन मला शोधत मनात आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला डोळ्यात साठवून बघ डोळ्यातले स्वप्न दडलेल्या विचारांमधून वाट काढत ओठावर आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला एकदा नवा श्चास घेउन बघ घुसमटलेल्या श्वासांमधून उसासे बाहेर पडले तळमळत मला म्हणाले-केव्हा पासून या मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.

ओल

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओल चुकवले वार शस्त्रांचे , सुकल्यात सर्व जखमा नाजूकशी फुलांची,पण्.....ती चीर चिघळती आहे ! थकली कधीच गात्रें , आता आधार लागे तरिही उरांत कुठली , ही धाव उधळती आहे? सांजावले कधीचे, बघ, पक्षी उडून गेले "घे,भरारी घे" ची पण साद हुरळती आहे ! शमवीत वेदनांना धन्वंतरी उगाच "होकार" ऐकण्याची सणक उसळती आहे ! सरणावरी कधीचे, अश्रू सुकून गेले फुटल्या घड्यांत मात्र.....ती "ओल" निथळती आहे.....ती "ओल" निथळती आहे ! ---------------------------------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे-----------------०३-नोव्हेंबर २०११, दु. २ वा.------

गजरा (३)

लेखक फिझा यांनी गुरुवार, 03/11/2011 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
3

जखम

लेखक जयवी यांनी बुधवार, 02/11/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
फिरते आहे घेऊन, जखम एक ठसठसती खपली आहे वरती पण आतून भळभळती वरपांगी कमालीचा ... हसरा चेहरा आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे सवयीचं होतंय आता, हुकमी हसू कधी मात्र दगा देतात, आपलेच आसू असेल का सोपं यापेक्षा अश्वत्थाम्याचं जिणं जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं जयश्री अंबासकर

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे !
काव्यरस

..उरला पलाश आता

लेखक राघव यांनी मंगळवार, 01/11/2011 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता.. नुसते वळून बघता तुटतात पाश आता.. पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते; घर तेवढे निमाले..उरला पलाश आता.. राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की.. सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता? अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना.. आसेतलेच आर्त.. होते निराश आता.. (विषण्ण) राघव
काव्यरस