Skip to main content

कविता

चारुकेशी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांग पाय थकले, वाटेतच रंग विटले श्वासातच माझ्या उतरले घन काळे हृदय मागते मागते मागते दे रे कान्हा उन्मळून टाकणारी लखलखती ज्वाला आर्त माझी हाक जीभ सोलून नटली हरेक उपकाराबरोबर रात्र-बेरात्र झोपली सोसण्याचे बळ खिळ्यासारखे ठोकताना कान्हा चोरशील का ह्या अस्तित्वाचा काला? हे काही स्वर डोळ्यांमध्ये राहिलेले स्वप्नांचे अनौरस क्षण त्यांच्यामागे वाढवलेले आशिषांच्या भोगतो घडाभर जखमा कान्हा माझ्या झोळीत एक सुदर्शनी शिवी घाला! ---- ह्या चारुकेशी बरोबर वाचा ------
काव्यरस

काही दिवसच असे असतात

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 07/11/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसच असे असतात विस्कटलेल्या घरात गोंगाटाच्या घेरात उधाणलेल्या भरात तरीही सुरात आपण म्हणतो दिवसभरात काहीच नाही झाल सरळ त्याला मात्र पडत राहते अशाच अनवट क्षणांची भुरळ आपण त्याला बसवत राहतो वेळापत्रकाच्या चौकटीत त्याला मात्र नसत अडकायचं रोजच्या घोटीव कटकटीत धावत राहतो आपण त्याच्या मागे, हातात ताट आणि बोटात घास घेवून, कातावत तो मात्र पळतो अंगणात अर्ध्या चड्डीत, बरबटलेल्या तोंडाने खट्याळ हसत , वेडावत त्याला असत भिडायचं आभाळाच्या गाण्याला आपल्या मुठीत भरायचं चांदोबाच्या नाण्याला डोळ्या पुढचं धुक आपल्या सरतच नाही निरागस आर्जव त्याचं दिसतच नाही झपाटलेल्या क्षणांनी विणलेला दिवस दिवसभर उनाडू
काव्यरस

जातकुळी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी. दिशाहीनतेचे डर्टी हॅरी फोर्टी फोर मॅग्नम खेळवत... आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल लॅगरांज बिंदूचा रोग झालेले... लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा... अढळपदातला अध्याहृत बंदिवास... डर्टि हॅरी रोखल्यावर आत्मभानाला सुटलेली घाण ह्यांच्यात बुडवून घेतले होते सारे वेडेबागडे शब्द दहा तोंडाच्या मुलाने रचलेल्या रचना रोशोमान सावल्यांचा खेळ... माझे हरवलेले डर्टी हॅरी, विभक्त झालेले एकटेपण आणि फोस्टर केअर मध्ये असलेले ते मूल माझा अढळपदाकडाचा बुर्ज्वा प्रवास कालच्या पानाव
काव्यरस

फळा

लेखक लीलाधर यांनी रविवार, 06/11/2011 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक फळा... प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची ऊधळण करणारा........ रंग माझा काळा नांव माझे फळा, घर माझी शाळा, जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा, हेडमास्तर इथले मालक विद्यार्थी त्यांचे बालक, आई वडीलांनंतर हेच आमचे पालक, ह्याच फळ्यावर गीरवतो अनेक विषयांचे धडे, त्याचमुळे जीवनात प्रत्येकाचे पाऊल पडते पुढे.... असा मी असलो जरी काळा तरी जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा सुजाण नागरीकांचा मळा.......

वारकरी होऊ -

लेखक विदेश यांनी रविवार, 06/11/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
वारकरी होऊ पंढरीस जाऊ पाहुनिया विठ्ठला आनंदात न्हाऊ |१| टाळ चिपळ्यांचा घुमवीत नाद एकमुखे घालू माऊलीस साद |२| मालदार कोणी झोळीवाला कोणी पताका उंचावून विठू एक जाणी |3| जनी नामा गोरा चोखा रोहिदास नाही दुजाभाव सर्वामुखी घास |४| ओळख ना पाळख नका दूर लोटू जीव लावूनिया पंगतीत भेटू |५| भेटू एकमेका जाऊ देवळात संत सज्जनासंगे दंगू कीर्तनात |६| लोभस मुद्रा कर कटीवर मूर्ती विठ्ठलाची शांत विटेवर |७| विठ्ठल विठ्ठल गजर टाळ्यात चंद्रभागा वाहते माझिया डोळ्यात |८| विठ्ठल विठ्ठल जप मनीध्यानी कर्तव्यात लाभ मन समाधा

जखम

लेखक अमोल मेंढे यांनी शनिवार, 05/11/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आयुष्यातली सर्वात मोठी चुक... मी तुझ्यावर निस्सीम प्रेम केलं... पण तरीही दगा दिलास तु.... माझं आयुष्यंच, उध्वस्त झालं.... तु केलं ते चांगलं केलंस... पण मला ते पचवणं कठिण गेलं... शांतपणे चालणार्‍या माझ्या आयुष्यात... एक विनाशकारी वादळ निर्माण झालं... खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा... पण तुला विसरणं कठीण आहे... कारण तु दिलेली विश्वासघाताची जखम... ह्रुदयात ताजी अजुन आहे... पण मी मरणार नाही तुझ्यावाचुन... नवी स्वप्ने मला सुध्दा पाहता येतात... कारण लक्षात ठेव... काळाच्या ओघात...सगळ्या जखमा भरुन येतात... सगळ्या जखमा भरुन येतात...
काव्यरस

दोनुली-नदीचा काठ

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली- पायवाट

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली - प्रश्न

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

शाप आदीमायाशक्तीचा......!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 04/11/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
शाप आदीमायाशक्तीचा......!

नाकतोंडात नळ्या घुसल्यावर
ती कासावीस झाली
रसायनाचा मार, हवेचा दाब
श्वास गुदमरला.....
प्राण निघायला लागला...
प्राण डोळ्यापर्यंत पोचताच
तिने पापण्या घट्ट मिटल्या
प्राण अडवला, मुठी आवळल्या
तोच तोंडातून शब्द फुटलेत
देवा! ..... वाचव रे देवा!!
दुसर्‍याच क्षणी संचारली तिच्यात
आदी-माया-शक्ती
गर्भाबाहेर आली.... आणि
कडाडली... वीज होऊन....!

"बाबा! का संपवलंत तुम्ही मला