आरास रास
लेखनविषय:
काव्यरस
अथांगास काय हिरे माणके सभोवर
कनक रुप्याची आरास रास अंगभर
तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा
सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा
सकाळी सकाळि मोतियांचे धुके-
स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे
सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि
उधळे जगी रंग चित्त झुंझवाया
ऋणांचे खळे आगळे वेगळे-
स्नेह वाटे परी गोत हे सोवळे
आंसवांना नसे दु:ख खारे इथे
निर्झराचे पिसे अवखळे खळखळे
.................अज्ञात
वाचने
1051
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
सकाळी सकाळि मोतियांचे धुके- स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि उधळे जगी रंग चित्त झुंझवाया...................!!
__/\__