Skip to main content

कविता

देवळातला देव भिकारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 12/11/2011 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
देवळातला देव भिकारी
नकाच मजला अर्पू कोणी गंध, अक्षदा, फुले, माळा नका मजला शेंदूर फासू नकाच द्या कळसा झळाळा कोण कोठला देव मज समजले उगाच येवूनी रांगा लावूनी पाया पडण्या, हार वाहण्या व्यापार्‍याची वस्तू करूनी देवळात मज कोंबले व्यर्थ फुकाचा नमस्कार करता अन्नछत्रात जेवूनी भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी का मजला देता ? पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता? नकाच मजला तेथे भेटू चालू असते माझी मुशाफिरी धनाचे नच लालूच मजला वृत्ती माझी आहे फकीरी देवळातला देव भिकारी - पाषाणभेद १२/११/२०११

चुकीचे हिशेब

लेखक यश पालकर यांनी शुक्रवार, 11/11/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी मांडले हिशेब नेहमी ते सारे चुकीचे होते ढाळले अश्रु ज्यांसमोर त्यांना हे नेहमीचे होते सोसले घाव सारे ते तर माझ्या ओळखीचे होते ना कळले सागर जे तळ तयांचे खोलीचे होते आर्त स्वर माझे हे कधीतरी तुझ्या अंगणीचे होते दुख कधी ना कळले कुणाला कारण सारे हे माझ्या मनीचे होते यशवंत

ती...........

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 11/11/2011 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
ती..... ती आहे हलकी, ती आहे फुलकी, ती नाही परकी अन् ती नाही बोलकी, पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी..... अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी.............. तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा, कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा, अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी........... एक डुलकी एक डुलकी, करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)

चांदण्यात फिरतांना.....

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 10/11/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात फिरतांना........ १)अक्षरचांदण ती : इतक्या दूर आलास माझ्या अक्षरवेलीला धरुन, बघ माझ्या नभातलं लखलखणारं अक्षरचांदण. तो: या चांदण्यात न्हाहातांना डोळाभरुन पाहायच होत तुला. तू अनेक अक्षरांच टिपूर टिपलं असेल आजवर मी माझा टिपूर साठवतोय मनात-डोळ्यात-सार्‍या देहात. २) गुलाबी छटा ती: बघ या चांदण्या हळुहळु संधिप्रकाशात विरु लागल्या जणु काही त्याने चांदण्यांना गुलाबी मिठीत कोंडुन ठेवलय त्याची छटा सार्‍या आसमंतात विखुरली आहे.. तो: संधिप्रकाश चोरपावलांनी तुझा गोरा रंग चोरुन नेतोय आणि तू चांदण्यात भिजुन अंग निथळत बसलीस क्षितीजाच्या क

पाणी अन् माती

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 10/11/2011 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कसं असतं ना माती आणि पाणी यांच नातंच निराळ पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर पाणी दिसत नाही अन् मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर माती दिसत नाही . . माणसाचही असंच असतं काहीसं कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते तर कधी डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो अन् मग . . कधी माती, कधी पाणी कधी पाणी, कधी माती (२) मातीत पाणी नसेल तर बीजे रुजत नसतात मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात . अन् पाण्यात माती नसेल तर फक्त मनीप्लांट रुजतो . . . कधीही फुले न येणारा (३) कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर मृदगंध दरवळत नसतो . जमिनीला तडा देणा-या अनेक रणरणत्या दिवसांमधून तापलेल्या म
काव्यरस

सूर्य कुडकुडतोय आभाळात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/11/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्या परदेशात थंडी पडू लागलीय. काल सकाळी सूर्य होता आभाळात. म्हणून सहज ग्यालेरीत जाऊ लागलो नि ह्या भर सूर्य प्रकाशात मी गारठून गेलो. आभाळात एवढा प्रखर सूर्य नि खाली थंडीचा कल्लोळ.मी पटकन शटर बंद केले. नि सूर्याकडे बघून घेतले.अगदी केविलवाणा वाटला सूर्य. त्यावरून सुचले.] पहाटे पहाटे -१० तापमान मी घाबरून गेलो थंडीला नि म्हणालो सूर्याला नको येउस आज खूप थंडी पडलीय गारठून जाशील उगाच कशी होईल सहन तुला ही थंडी भीती वाटते तू असतो नागडा सतत खेळत बसशील अंगणात तुझ्या सोबत कोणी नाही तू अगदी एकटा एकटा कशी नाहीरे भीती वाटत..?
काव्यरस

ससे आणि जादुगार -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 10/11/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे छोटे ससे कसे टकमक इंद्रधनू बघती - बघता कोपऱ्यात ते रुसुनी मुकाट का बसती ! चुन्यात बुडुनी आलो वाटे, लाल ना कुणी निळे - रंग कुणाचे ना नारंगी कुणीच ना काळे पिवळे !

विसरता येत नाही

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 10/11/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
विसरता येत नाही , असे नसतेच काही मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई.. किती जाती उन्हाळे , बदलतो चेहराही नव्या ह्या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही तिला वेटाळूनी मी प्राशिला गंध सारा तिला फोडुनी प्यावे असे उरतेच काही खरे ते शोधताना थके श्रद्धा मनाची भेटतो देव ही पण मनी गळतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही जरा उरतेच काही नदीपात्रामध्ये मी सोडतो दीपमाळा परि गंगा जळातुन निघे भलतेच काही मानतो कागदाला ... वंदितो लेखणीला परि शब्दात अंतिम असे नसतेच काही अरुण म्हात्रे

मैत्री……

लेखक विनीता देशपांडे यांनी बुधवार, 09/11/2011 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले मनामधे खोल रुतलेले अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते कधी अव्यक्त्,कधी अवास्तव तरीही शाश्वत अन विश्वस्त अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते कधी बेभान्,कधी बेधुंद निसटलेला तोल सावरणारे अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते ( विनीता देशपांडे)