भरारी
अंधार हा असा, काळोखल्या दिशा
तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा
मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी
सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी
दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली
जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती
नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी
तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस
मिसळपाव