Skip to main content

खेळ दैवाचा....

Published on सोमवार, 12/12/2011
कसा प्रसंग हा येतो पहा तो, कधी कुणाच्या आयुष्यामध्ये | जिथल्या तिथे थांबते सारे, चालले होते जे वेगामध्ये | कुणास मिळता हा पुर्णविराम तो, अल्पविराम कुणास त्या मिळूनी जातो | कुणाची सोडूनी साथ कुणीतरी, एकांत कुणास त्या देऊनी जातो | आपण म्हणतो जरी त्यास त्या क्षणी, आम्ही आहोत ना तुझ्या सोबती | सोबत असते ती परी.. क्षणभराची, अथांग उरल्या त्या जन्मातली | क्षण सरता तो जलद गतीने, पाऊले मागे का..? अडखळती | कुणास आठवूनी कुणी असे का..? वळणावर एका त्या घुटमळती | घुटमळणारे मन ते सोडूनी, जावेच लागते तिला पुढे | काळा सोबत जर.. पाउले चालती तर.., चालावेच लागते ना तिला..? त्यांच्यासवे | चालता-चालता मग पाउले थकली तर, आधार हातांचा तिला कुणाच्या मिळे | कुणी दिला हात जरी आधार म्हणुनी तरी, झेपावेल मन का तिचे..? त्या कुणाच्या कडे | असे काही सुचवूनी गेले मन रडवूनी, प्रश्न मनात ह्या माझ्या एकच उरे | देव खेळ खेळी का हा..? दोघा एक करी का हा..? न्यावे लागे जर त्याला कुणा एकाला सवे | हर्षद अ. प्रभुदेसाई..........
लेखनविषय:

याद्या 1996
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान रचना!

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ या ओळी आठवल्या. चंगली रचना.