Skip to main content

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2112
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नि:शब्द!!

सोनल.... मस्त गं.. श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.