Skip to main content

कविता

इति प्रेमपुराण संपले

लेखक विदेश यांनी गुरुवार, 08/12/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्यावर त्याचे चॉकोप्रेम त्याच्यावर तिचे कॅडप्रेम जागत होता तिच्याचसाठी जगात होती त्याच्याचसाठी दु:ख काहीच ठाऊक नव्हते सुखात दोघे डुंबत होते ! आले कधी जर त्याचे डोळे तिचेच डोळे पाणी गाळे ! हासत खेळत आनंदाने मजेत जीवन चालू होते जिवापाड ते प्रेम तयांचे तहानभूकही विसरायाचे त्या प्रेमाला दृष्ट लागली... सुमुहुर्ताची ओढ लागली ! इति प्रेमपुराण संपले -त्या दोघांचे 'लग्न' लागले !

म्हातारा बसलेला असतो ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 08/12/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
चटेरीपटेरी अंडरप्यांट घालून डोक्यावर टोपीचा द्रोण लेऊन म्हातारा बसलेला असतो संध्याकाळी त्या लाकडी बाकावर सूर्याचे कोवळे उन्ह घेत अंगावर उघडाबंब ...!!
काव्यरस

पण........!

लेखक फिझा यांनी बुधवार, 07/12/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी राखून ठेवले होते शब्द, परवा शब्दांची ची एकच घाई उडाली, कागदावर उमटण्यासाठी त्यांची अगदी रांगच लागली भेटणार होतास तू , ठरवले होते म्हणूनच , सांगावे सारे सारे तुला,.......पण ............. न धाडता फक्त लिहिलेली पत्र एक न अनेक, वाचावीत घडा घडा ऐकत राहशील तू फक्त या आशेने सांगत राहावे सारे सारे तुला.......पण....... विणले होते धागे ,गुंतले होते मन कळत होते फुलांनाही आता उमलणे , वाटेवर डोळे लावून बसलेल्या राधेला सतावणे , येशील तेव्हा सांगेन खरे सारे सारे तुला.....पण...... अनोळखी म्हणून भेटलास खरा आत्ताच ओळख झाली म्हणालास खरा जे माझे नव्हते कधीच, मी गमावून बसले होते, तू म

खुणा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/12/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे आकाशी तुटल्या तार्‍यांचे खेद कुणाला आता स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले .......................अज्ञात ७/१२/२०११
काव्यरस

जगण

लेखक मयुरपिंपळे यांनी मंगळवार, 06/12/2011 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगण बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण | लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा | प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे | -- मयुर

चान्दरात

लेखक शिल्पा१९७३ यांनी मंगळवार, 06/12/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या आठवणीनी मन झाले धुन्द, दरवळतो अजुनही रोमारोमात निशिगन्ध, स्पर्शाने तुझ्या फुलला अन्गात पारिजात, श्वासात मारवा अन नजरेत चान्दरात, ओठानी खोलशी तू कितीएक अबोल बन्ध, चेतवी स्वप्नाचे दिवे, मनात मन्द मन्द, घेतले कवेत तु, कोसळते बाहुपाशात मी, ओल्या वणव्यात जळाया, पतन्गापरी आतुर मी, पेचाडावपेचात रन्गत गेली रात्र, उमलत गेले हळूहळू एकएक गात्र, वाटतेय चालु रहावे, असेच हे सत्र, उलगडेल ना मग, जीवनाचे ते सूत्र, मुक्त होण्यासाठि सुद्धा हवेच असते ना एक बन्ध, निश्शब्द, निस्तब्ध, निसन्दिग्ध, अनन्त अनन्त...
काव्यरस

हि तर सुंदर कविता झाली !

लेखक अविनाश खेडकर यांनी मंगळवार, 06/12/2011 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म घेतला का मी येथे कधी कधी मज उगा वाटते कमावण्याच्या अरूंद वाटेवर बेकारांची गर्दी दाटते किती भिकारी बनले येथे एक टिचेच्या पोटासाठी धान्य दडविती गोदामी ते केवल आपुल्या स्वार्थासाठी समानतेची शिकवण आमुची एकात्मतेची आस वाटते शाळेमधल्या दाखल्यात मग धर्म-जात ती कशी नाचते? घोटाळ्यांची भरवून स्पर्धा इथला सेवक छळतो आहे आर्त हुंदका महागाईचा कुणा कधी का कळतो आहे? शहिदांच्या बलीदानांवरही शब्दच नव्हता स्मरला ज्यांना अफजल गुरूच्या माफीसाठी कोण पुरवितो भाषण त्यांना? खून दरोडे, धोकादाडी बलात्कारही रोज पाहिले अराजक्तेच्या वादळात या सदाचारी का कुणी न राहिले? कुणा मागावी दाद आता ती न्यायच पोषी अन्यायाला

गरीब बिचार्‍या, दम खा

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/12/2011 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
गरीब बिचार्‍या, दम खा
गरीब बिचारा शोधतोय तो सायबिणीचे पडके घर - मी म्हणतो, "विचार, जवळ चांगला बार असला तर..." . बुरसट चिरे न्हाते-धूते अश्रू भले सुकवू नको कुळाचारांस आसूसले भाव भले आटवू नको . म्हटले कोणी : "रिबेलो मूळचे अहो, त्या वाडीचे" पात्रांव, छ्या!
काव्यरस

ती खरी का मी खरा ..?

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 04/12/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
ती खरी का मी खरा ..? हे कधी कळलेच नाही शब्द तिचे नि शब्द माझे सूर कधी जुळलेच नाही हे न माझे हे न तिचे हे कधी वळलेच नाही रंग माझे रंग तिचे मिसळणे जमलेच नाही ती अशी नि मी असा चिंब कधी झालोच नाही ती खरी का मी खरा ..? हे कधी कळलेच नाही .
काव्यरस

चेतना

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 04/12/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट पवनास न बंधन धावतसे फुंफाट क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या नांदी दिवसाची उगवे रमल पहाट तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा तो अथक प्रवासी चाले आपली वाट पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात चेतना सकल हृदयात; चेतवी वात दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात चिरअनंत चाले योगभारला संवाद मी अंश तयाचा आक्रमतो एकांत विसरतो कसा मग मावळणे अभिजात जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात ............................अज्ञात
काव्यरस