मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरळ रस्ता

मयुरपिंपळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)

वाचने 10550 वाचनखूण प्रतिक्रिया 41

एक लडकी भिगी भागी माझं नाव लंगडा त्यागी ;-) मला का मिळत नाही या जगी..? मी रडलो तर म्हणतात उगी..उगी..! चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ... हं.... व्यर्थ हे जिवन>>>> हां सुचलं सुचलं--- व्यर्थं हे माझे जिवन तो सिनेमातला जी-१ खायला ग्येलो मी जिलब्या पण तोंडात पडला घावन ... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Tue, 01/31/2012 - 21:56
चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
चचा येणार नाही इतक्यात परतून, मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून, टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या, हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा.

मूकवाचक Wed, 02/01/2012 - 10:17
कविता म्हणजे फकस्त दोन ओळीमधले यमक प्राची ला गच्ची जोडणे हेच तिचे गमक नवकवीना घाबरून आज ओस पडला कट्टा कवितेची चारचौघात तरी थाम्बली आहे थट्टा शब्द आणि यमके यान्चा नुसता पोर खेळ भाव आणि आशयाचा मात्र कुठे न बसे मेळ काव्य चारोळ्यान्चा कविराज सोडा वाममार्ग, गद्याचे पकडा विमान! -- मूकवाचक (गद्यकवि)

In reply to by मूकवाचक

प्रचेतस Wed, 02/01/2012 - 10:25
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता |
जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट :P

In reply to by प्रचेतस

@जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो.. वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ

In reply to by प्रचेतस

मोहनराव Wed, 02/01/2012 - 14:22
ठार जाहलो वल्लीसाहेब! फुटलो! ही घ्या... भरुदे नवकवितांचा माठ करुदे त्यांनाही मान ताठ येउदे परत त्यावर विडंबनाची लाट काव्यरसाची लागेना का वाट!! ;)

In reply to by मोहनराव

वपाडाव Wed, 02/01/2012 - 14:36
यावर उत्तर म्हणुन मला एक कविता लिहावी वाटत आहे... @ क्या बैठी है वल्ली की शॉट, नवकवि की लगगयी है वाट, और खडी होगयी है खाट, सगळे पळ रहे है सुसाट !!

स्पा Wed, 02/01/2012 - 14:42
जीवन म्हणजे एक खारा पिस्ता परवडत नाही म्हणून होतात मनाला खस्ता | आमच्या कवितांना नाही कुठं कट्टा जिलब्या पाडतोय.. करा चट्टा मट्टा | शब्द आणि यमक ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये अर्थाचा कुठंही बसत नाही मेळ | नव्या , जुन्या मेम्ब्रांनी घेतले नव वळण पण "मिपा " मात्र अजूनही नेहमीसारखेच सरळ|

In reply to by मयुरपिंपळे

पियुशा Wed, 02/01/2012 - 16:09
@ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस नका होउ लगेच ,मि पा कराची सवय आहे ही ;) तुम्ही छान छान कविता करा, छान छान प्रतिसाद आपोआप मिळ्तील :)

In reply to by मयुरपिंपळे

गवि गुरुवार, 02/02/2012 - 11:05
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
अहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे.. आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत? मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??

In reply to by मयुरपिंपळे

अन्नू गुरुवार, 02/02/2012 - 18:30
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
मिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे. असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो. राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला! पु.ले.शु. :)

In reply to by अन्नू

मी-सौरभ गुरुवार, 02/02/2012 - 20:13
@मयूर पिंपळे अस्सं नाय कराच्च.. तुम्ही आत्ता नदीच्या अलीकडे आहात.. पलीकडे यायला पोहावं लागणारच :) पु.ले.शु. (नदीच्या पुलावरुन मजा बघणारा)

गवि गुरुवार, 02/02/2012 - 10:15
जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? भारतीय स्त्रीच्या मनाचा अन जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न..

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/02/2012 - 11:24
@जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? अरे बास रे बास...! अता हसून हसून मारायची पाळी येणारे...

इरसाल गुरुवार, 02/02/2012 - 14:51
लग्न म्हणजे आहे एक शिरस्ता त्यासाठी तुम्ही फाडलाय का बस्ता आनंदाला इथे कुठेही नाही तोटा नातेवाईकांनी मांडलीय पुरेपूर थट्टा रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ नवरी म्हणे नवर्याला लागतोय का इतका वेळ गाद्या गिरद्यांनी बदलला रस्ता पण नवरा मात्र सरळ (आंबट चवी )