शरपंजरी

अज्ञातकुल जे न देखे रवी...
ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या मग वाट पहाणे आठवणे गत उरले नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले .........................अज्ञात
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

4 टिप्पण्या 1,121 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या
अफाट!!

प्रशांत उदय मनोहर नवीन

"काहुर गुंता" सोडलं तर अगदी छंदबद्ध झालीये कविता. पण "काहुर गुंता" तसंच ठेवून लयीमध्येही चमत्कृती निर्माण होत असल्यामुळे छान वाटतंय. पु.क.ले.शु.