जो डाव आता, असे खेळला मी, तो दाविनच जिंकुनी
कवी झाले अंतर, काव्यच वेदना ही,
ही रात्र कविता जणू
इतरांच्या कवितांना, ए ऐकणारे,
हे काव्यही ऐक तू
येऊन जरा बघ, मी प्रीत्यर्थ तुझिया,
जगतो हे जीवन कसे
अश्रुंच्या धाग्यांनी, शिवतो सदा मी,
हे घाव जे तू दिले
घेऊन तुझे दुःख, आसक्तीद्वारी,
मी खेळलो बघ जुगार
जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी,
हा खेळ झाला असा
जे समरसुनी मी प्रेम केले,
त्यासम उदाहरण न खास
जरी काजवा मी, प्रेमात पेटून,
जणू जाहलो सूर्य आज
माझ्यामुळे प्रेम, जीवित असे
आणि मैफिल तुझी रंगदार
जेव्हा नसेन मी, रडत सारे जग हे,
हुडकेल माझेच माग
ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे जे,
कुणीही खरीदू शके
माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता,
ये ध्यानी सारे कसे
आहे प्रवासी, असो पंथ कुठलाही,
जाईन त्या लंघुनी
जो डाव आता, असे खेळला मी,
तो दाविनच जिंकुनी
२००६०५०३
ही कविता माझी नाही. हे आविष्करण मात्र माझेच आहे!
ही मूळ कविता कदाचित तुमच्या ओळखीची असू शकेल. पटली ओळख तर अवश्य सांगा!
याद्या
1686
प्रतिक्रिया
7
काव्यरस
मिसळपाव
जरी जिंकलो जग, तरी हारलो
रूपांतर आवडले
दिल आज शायर गम आज नगमा
प्रतिसादाखातर हार्दिक धन्यवाद!
शीर्षक पाहिलं आणि गँबलर
छन्न प्रतिसाद
दिपक, आता प्रच्छन्न प्रतिसाद द्यायला हरकत नाही!!