जागे होण्याआधी गोकुळ
शांत अजुन पानांची सळसळ
चंद्र केशरी अजुनी आभाळी
पहाटवारा वाहे अवखळ
अजुन जुईची बंद पाकळी
नसे अजुनही किलबिल जागी
खट्याळ वारा घाली फुंकर
होई हलके राधा जागी
दाट सावळ्या केसांना मग
हळुच सारुन मागे काना
अर्ध्या मिटल्या लोचनात त्या
पहिली आठवण होते कान्हा
अधीर्या ओल्या अंधारातुन
भारावून ती चाले वाट
तिलाच ऐकू येतो आणिक
यमुनेचा तो हिरवा काठ
दिसते तेथे बाहू पसरुन
तीच आकॄती ओळखीचा बांधा
घुमु लागता त्याचा पावा
राधा नुरते आता राधा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1897
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! सुन्दर काव्य आवड्ले
व्वा ! सुन्दर काव्य आवड्ले :)
मस्त!
चांगली कल्पना. आवडली!
राघव
+१
In reply to मस्त! by राघव
+१
सुंदर
आवडली.
प्रेरणा , मस्त कविता आहे ,
प्रेरणा ,
मस्त कविता आहे , एक्दम दिल्खुश....
असेच छान छान लिहा .अजुन छान कविता येउ देत त्यासाठी शुभेच्छा.....
सुंदर.
सुंदर.
राधा कृष्णावर झालेली काव्य हा
राधा कृष्णावर झालेली काव्य हा भारतीय संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे...त्यात आज अजुन एक मोहोर लागली... व्वाहवा...उत्तम आणी मनाला भुरळ पाडणारी रचना :-)
सुंदर काव्य
सुंदर काव्य
व्वा... मस्तच...विशेषतःह्या
व्वा... मस्तच...विशेषतःह्या खालच्या ओळी तर खुपच 'रोमँटीक' आहेत... :)
दाट सावळ्या केसांना मग
हळुच सारुन मागे काना
अर्ध्या मिटल्या लोचनात त्या
पहिली आठवण होते कान्हा
सुं द र !
खूप आवडली कविता.
लिहीत रहा. शुभेच्छा!
+ १
In reply to सुं द र ! by चैतन्य दीक्षित
असेच म्हणतो! छान आहे! :)
लिहीत राहा.
सुंदर कविता.
सुंदर कविता. :)
मस्त मस्त....! प्रेम करणारे
मस्त मस्त....!
प्रेम करणारे प्रेमिक (न करणारेही) आपापल्या पद्धतीनं राधा कृष्ण जोडीच्या नात्याचं विश्लेषण करत राहतात.