लेखकसोनल कर्णिक वायकुळयांनी शुक्रवार, 13/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यातला चंद्र
आणि मनातला अंधार घेऊन
सत्याचे भास झेलत
स्वप्नांच्या उंबरठ्यावर
निद्रेची वाट बघत
ताटकळत उभी होती रात्र
माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.
सोनल कर्णिक ह्यांची माफी मागून... हे विडंबन कविता करण्याचा प्रयत्न करत आहे...
मिसळपाव वर धागा
टाकला असाच काही बाही लिहून
इतर लेखांना प्रतिसाद देत
आणि कविता वाचत
कुणी तरी आपले ही
वाचेल ह्याची वेडी आशा धरत...
एकही प्रतिसाद आला नाही
जन्म संपे पर्यंत..
मुक्त विहारी
माझी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. तशी मागावीशी वाटली असेल तर मुळात हेतुत गफलत आहे. मग तुमचा विडम्बनाचा प्रयत्न इथे publish करायला नको होतात.
खर तर तुमची काय किंवा इतर कोणाची काय; प्रतिभा दाखवायला तुमचे स्वतःचे लेखन फळे आहेतच की.
त्यामुळे माफीचा आव नसता आणला तरी चालला असता.
अतृप्त आत्मा,
तुमच विडंबन मात्र आवडल. खूप सहज. तुमच्या space मध्ये publish केल असत तर तुमच्या चाहत्यांच्या ब-याच प्रतिक्रिया मिळाल्या असत्या.
प्रतिक्रिया
गल्लीतला चंद्रू उभा...तोंडात
व्वा!! क्या बात है....
In reply to गल्लीतला चंद्रू उभा...तोंडात by अत्रुप्त आत्मा
भटजी...
In reply to गल्लीतला चंद्रू उभा...तोंडात by अत्रुप्त आत्मा
@अगदी सहजरीत्या स्फुरलेलं
In reply to भटजी... by धन्या
मिसळपाव वर धागा
मुक्त विहारी माझी माफी