Skip to main content

परिटघडी...!

लेखक वेणू यांनी सोमवार, 16/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.

"तुला माझी साथ आहे"
शब्द, शब्दच राहतात,
तेव्हा वेदना हेलावते,
गोठतात नाजूक भावनाही!

चेहरा शांत असला,
तरी कोपरा दुखावलेला असतो- आतला!!
फक्त असे कोपरे दुमडत जाऊन,
मन संकुचित होऊ नये,
इतकंच जपतेय..

शेवटी,
मनाची 'परिटघडी'
जितकी नीटनेटकी
तितकाच आयुष्याला
कोरेपणा....!!

-वेणू
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य https://venusahitya.blogspot.com/

लेखनविषय:

वाचने 1315
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

थंड शब्दांची फुंकर घालावीच लागते,
कधी ना कधी कळतेपणानं,
भळ्भळत्या जखमेवर ऊतारा म्हणून |

स्वतःच्याच मनातल्या जखमा,
ताज्या ठेवणं सोपं नाहिये,
चेहरा कोरा ठेवून |

परिट्घडिचा संसार,
सांभाळलाय तरीहि,
भावना गोठतातचं अजूनहि |

जमेल ,
आयुष्यात ऊरलेल्या ,
हे हि जमेल , कधीतरी !