Skip to main content

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

शनिवार, 27/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही सकाळी तास न तास वाची पेपर एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही पाठवावे याला कधी भाजीबाजारात घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही. axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा कसा येत नाही आणि म्हणे आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही मित्रांशी तास न तास गप्पा मारी वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
लेखनविषय:

वाचने 2873
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

सहमत आहे. कवितेतील भावनेशी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी पकडून काही फायदा नाय वो, तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार नाहीये इथे. ;)

In reply to by गणामास्तर

@ तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार नाहीये इथे. smiley>>> मला काहि अपेक्षितच नाहिय्ये... :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी पकडून काही फायदा नाय वो, तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार नाहीये इथे. ;)

मित्रांशी तास न तास गप्पा मारी वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही >>>>>> हे भारी हाय :)

कवितेतल्या भावनेशी मीही सहमत. (नव) विवाहित पुरुषांच्याही या प्रकारच्या भावना असतात. बहुतांश वेळा त्या बोलल्या जात नाहीत.

एक बाजु बहुतेक व्यवस्थित मांडलेली असल्याचे दिसत आहे. काव्य आवडले. आता दुसर्‍या बाजुची वाट पहात आहे ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ओ चोता दोन वाट कशाला पाहताय? येऊ द्या कि तुमच्याकडूनच ;)

कविता सुंदरच आहे परंतु कवितेतल्या भावनेशी थोडा असहमत.... हल्ली अश्या लाडिक तक्रारी करणारी बायको असतेच कुठे...... आता एक घाव आणि दोन तुकडे........

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सहमत. रेडिओतल्या श्रुतिकांसारखं असं वातावरण आता कुठे असतं.. (पूर्वीही असायचं का माहीत नाही !)