मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

’तिच्यामुळे’

ह्रषिकेश चुरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पेन होतं, कागद होता त्या रात्री तो जागत होता रात्र चढू लागली त्याला आशा वाटली चंद्र गोजिरा झाला गार वारा झाला मन कोरं होतं, कागदही कोरा होता तरी पेन कागदाला भिडला पाच मिनीटं तसाच राहीला, एक ठिपका करून वर आला रात्रभर हेच चालू राहीले श्वास चालू राहीले, आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते घड्याळाचे काटे सरकू लागले आज कविता होणार नाही हे कळू लागले रात्र संपू लागली पेनातली शाई सुकू लागली झोप येऊ लागली त्याने अखेर पेन उचलला आणि ’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला ह्रषिकेश चुरी

वाचने 1407 वाचनखूण प्रतिक्रिया 3

स्पंदना 25/10/2012 - 06:14
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही । फिस्सकन हस्सयाचे आहे पण हसणार नाही ।