नि:शब्द शब्द, हुंकार मनाचे
ओले किनारे, खार्या पाण्याचे
काळजाचा साचा, उघडून वाचा
श्वास बाळाचे, ध्यास मायेचे
वळणांचा घाट, वारा मोकाट
सारे सारे कांही, होते आट पाट
आलेली पहाट, पावलांची वाट
आईची सय करते, साय घनदाट
...........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1019
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचले..
>>>> ........................
In reply to वाचले.. by मुक्त विहारि