सकाळी दाढी करता करता
टिव्ही चालु केला
बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या
फार फार वाईट वाटल ते बघुन
बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन.
दुपारी जेवताना परत टिव्ही लावला
बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्या जनावरांची.
मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन
अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न
टाकायला कचर्याच्या डब्ब्यात.
रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो.
मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला.
मनात परत ऐकदा दुखावलो,
मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या.
फोटो कसला पाठवतो लाईक करायला ,
त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें.
मी मात्र हाकलल त्यावेळी रस्त्यावर माझ्याजवळ,
काहितरी खायला द्या म्हणुन भिक मागणार्या त्या लहान मुलाला.
खरच माझ्यातला माणुस असा आहे का की खरच जगण झाल आहे माणुसकीविहीन
दुसर्याला मदत करायची सोडुन आपण आहोत आपल्याच सुखात तल्लीन.
दुसर्याला मदत करायची सोडुन आपण आहोत आपल्याच सुखात तल्लीन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1000
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
निश,
मुक्त विहारि साहेब व पक पक पक साहेब, तुमचे मनापासुन आभार