निळारंभ
हे निळारंभ मुक्तसे
काही मला खुणावे
बोलेल जरी मजपाशी
मन करीन मोकळे ll १ ll
माझ्या उरात दाटे
व्यथा बरे कशाची
करतील दूर काय
तिज मेघ सावळे ll २ ll
बोलू कसा तयाला?
जीव आर्त गुदमरे
संकेत विहंग सांगे
घे भरारी अवखळे ll ३ ll
मी बोलता जरासा
तोही भरून आला
तळमळ झुगारुनी
तो विजेत विरघळे ll ४ ll
हा पाऊस आसवांचा
वाहून हर्ष त्याला
मी ही भिजून चिंब
दु:ख सारे निमाले ll ५ ll
- सार्थबोध
मिसळपाव