Skip to main content

कविता

तू …. !

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी मंगळवार, 22/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस तू ? काय करतेस आता ? मी इथे अन तू …. तिथे डोळे भरून येतात आणि झुकतो ग माथा न सावरता … कधी… कधी … रोज…. रोज…. येत असेल सय आठवू नकोस असं कसं म्हणू ? आठवणीत सारखा असतो 'तू……. ' दोघांच्याही साथीला आयुष्यभर …. !!

आजकाल हे असे आहे...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 22/10/2013 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल असे आहे... खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग) खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत) आजकाल हे असे आहे... अभिनेते राजकारणात शिरत आहेत अभिनेते "राजकारण" करत आहेत आजकाल हे असे आहे... राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत आजकाल हे असे आहे... बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स) आजकाल हे असे आहे... माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे! माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे! आजकाल हे असे आहे... गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे गरीबी श्रीमंती य
काव्यरस

अजून आहे मी वनवासी

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 21/10/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी युगायुगांची फरफट,
काव्यरस

प्रसाद शेरणीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी रविवार, 20/10/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुनी नरहरीला । आनंद होई मनाला माझा माथा हरी लागो दे चरणाला । धृ। भक्त प्रल्हादासाठी नारायण अवतरला हिरण्य कश्पूचा वध त्याने केला संतासाठी हरी खांबी प्रगटला ।१। राक्षसांनी प्रल्हादाला खूप छळले हत्ती खाली दिले कड्यावरुनी फेकिले जेथे तेथे त्याशी नामाने तारिले । २। वैशाख पुनवेशी यात्रा भरते मोठी नरुशिहपुरशि भक्त गण लोटती नरहरीचा जयजयकार करूया सुखाला । ३। पालखी सजवून मिरवणूक न्यारी दंग होऊन भक्त रमती भजनात सारी शेरणी काढून प्रसाद वाटला । ४ । संतोष बोंगाळे मु. पो. पिंपळखुंटे ता . माढा जि . सोलापूर

पुन्हा नव्याने..

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 20/10/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने पुन्हा नव्या उलगडती वाटा पुन्हा नवी अधरांवर लिहिली नाविन्याची लोभस गाथा अस्तित्वाचा नवा अर्थ अन् जगणे सारे नवेच झाले बुरसटलेले पाश तोडुनी नवे पाखरू नभी उडाले... नव्या नव्याची नवलाई ही व्यापुन घेते सारे जीवन नव्या नभीची नवीन बिजली छेदून जाते जुने कृष्ण घन नव्या सुरांची नवी भुपाळी नवी सुगंधी पहाट गाते अधीर राधा पुन्हा नव्याने श्यामनिळ्याची होऊन जाते!! © अदिती जोशी 11.6.13

सल अंतरीचा..

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 17/10/2013 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी.. हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली.. त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही... कविता बिविता जे काय समजायचं ते समजा.. तिच मला टाळण फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे... प्रेम करता येईल अस? फलेच्छा सोडून...?? कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे?? सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...

शब्द चिमुकले सांडत होते ...

लेखक जेनी... यांनी बुधवार, 16/10/2013 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या इवलुश्या पानावरती शब्द चिमुकले सांडत होते फुलपाखरापरी फडफडणारे कवितेचे मन भासत होते अलगद कागद हातावरती हाताच्याही बोटावरती मन बोटासंगे बोलत होते शब्द चिमुकले सांडत होते बरेच काहि अवती भवती भोवतालीच्या ओठावरती सार तयाचे मांडत होते शब्द चिमुकले सांडत होते मी न माझी, माझे न काहि माझ्यासाठी मीपण नाहि नाहि नाहि म्हणता म्हणता कवितेला मी सांगत होते ओळी ओळीवर अक्षरांचे पुंजकेच जणु साठत होते शब्द म्हणुनी शब्दासंगे कवितेचे मन डोलत होते शब्द चिमुकले सांडत होते शब्द चिमुकले सांडत होते...

वानोळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 16/10/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ? चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ? ........................अज्ञात
काव्यरस

रागावणे – समजावणे

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/10/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
........................१............................. रागवलेली ती, समजूत काढणारा मी रागवलेला मी, समजूत काढणारी ती या दोन विरुद्ध गोष्टी आहेत . ती रागावली कि तिची समजूत काढणे सोपे आहे ते जमते आजकाल मला पण तिच्यावर रागावून ती समजूत काढत असतांना रागावलेलेच राहणे फार अवघड असते ते अजूनही जमलेले नाही मला . कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला? ........................२............................. रागावलेली ती लगेच लक्षात येते रागावलेला मी तिला कळतोच असे नाही कां कळूनही वळत नाही? . आपल्या माणसावर रागावणे हा आपला हक्क जरूर आहे . पण आपलं माणूस आपल्यावर राग
काव्यरस