Skip to main content

एकाकी वाट चालताना

लेखक मालविका यांनी सोमवार, 28/02/2022 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी वाट चालताना भासे तुझाच स्पर्श आठवण अजुनी येते जरी सरली कितीक वर्ष त्या अनवट डोंगरवाटा चढताना धरीला हात वचन दिलेस तू मला देईन कायम साथ संगतीने तुझ्या घालविले मी सुखद क्षण निवांत आताच कसे मग झाले हे विश्वच सारे शांत तू आहेस अजुनी माझ्या चिरकाल स्मृतीतून विहरत आठवणीत लाविला चाफा जो आहे अजून बहरत
लेखनविषय:

वाचने 2142
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तू आहेस अजुनी माझ्या चिरकाल स्मृतीतून विहरत आठवणीत लाविला चाफा जो आहे अजून बहरत
छान!

छान आहे.

आवडली पैजारबुवा,

आठवणीतला चाफा कायमच ताजा राहतो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!