Skip to main content

कविता

सुराई

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 14/03/2014 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
'सुराई' अजून देहातुनी उसळते अजाण शाई अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई अधीर गात्रात रात होते पहाटताना ... अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई ! अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई डॉ.सुनील अहिरराव

आयचाघोरसचा सिद्धांत

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 14/03/2014 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिरणार्‍या तुला वर्तुळात त्रिकोण काढून नव्वद अंशातून बगितलं हळूच टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस? शेवटी कितीही वेगात फिरली तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)
काव्यरस

तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 11/03/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले रणीँ हासुनी बोलले जे महात्मे जरा टोकता मी किती कृद्ध झाले किती सर्वव्यापी तुझा न्याय होता मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले चिता जाळण्याची नको आज चिँता पहा लोक सारे इथे गृद्ध झाले किती हाय करुणे तुझा बोलबाला कसाई जुने ते अता बुद्ध झाले तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला बलीदान माझे पहा शुद्ध झाले तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले डॉ.सुनील अहिरराव

चला, असाही एक वाढदिवस...

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 11/03/2014 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचे उठणे रोजचे आवरणे रोजचे तेच तेच करणे आजही तसेच....? चला..., असाही एक वाढदिवस... सकाळपासून जुंपलेला.... उन्हातान्हात राबलेला... ठिकठिकाणी रापलेला... ओथंबून वाहिला आजही.... चला.., असाही एक वाढदिवस...

क्षितिज

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 11/03/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मन विलाप जाणते धरतीचा सागरतिरी सूर्याचे ओझरणे प्रतिसाद लाटांवरुनी ll १ ll विहंग एकला प्रवासी समांतर अवकाशी धरतीस व्‍याकुळलेल्या साथ क्षणापुरती ll २ ll संध्येस का छळतो उनाड अल्लड वारा मावळत्या कातरवेळी जीव एकल्या विहारा ll ३ ll क्षितिजाचे रूप विलोभी उतरे गगनावरुनी डोळ्यादेखत माझ्या मिसळे पाण्यामधुनी ll ४ ll - सार्थबोध

तू अता ये याच रस्त्याने तुझ्यापाशी ...

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 10/03/2014 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
हात भाग्याने न माझा सोडला होता तूच तेव्हा पाय माझा ओढला होता ! पाळला मी शब्द माझा तो युगानुयुगे ... तूच जन्माचा शिरस्ता मोडला होता ! मी तुझी अवलोकिली गात्रातली जादु मी तुझा मग हात हलके चोळला होता ! तू अता ये याच रस्त्त्याने तुझ्यापाशी ... काल मी मजपासुनी तो जोडला होता ! तू अता शपथेवरी हे सांगते आहे: परवलीचा शब्द अपुला फोडला होता ! चित्रगुप्ताची लिहू ये चोपडी आता तू स्वतःचा काल गुन्हा खोडला होता ! भक्त भगवे पळुन गेले चोरवाटेने मेघश्यामल देव त्यांनी झोडला होता! डॉ.सुनील अहिरराव

सावित्रीच्या लेकी - महिला दिना निमित्त

लेखक नेत्रा वैद्य यांनी शनिवार, 08/03/2014 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिना निमित्त हातावर पोट घेऊन जगणार्‍या कष्टकरी महिलांची स्थिती दर्शविणारी एक कविता : सावित्रीच्या लेकी, आम्ही सावीत्रीच्या लेकी घेऊनिया पोट हाती, जगू पा़खरांच्या साठी आम्ही सावित्रीच्या लेकी बालपण गरीबीतूनी, हौस परि शिकण्याची निरागस बालपणी, गाठ लग्नबंधनाची नाही तमा उन्हाची ती, नाही पायी वहाणाही संसाराचा भार माथी, वाटचाल एकटीची कोवळ्या त्या वयातूनी, ल्याली मातॄत्वाची लेणी तिला उमगलं नाही, ते वरदान कि शापचि बासनात पुस्तक पाटी, डाव संसार मांडूनी वणवण पोटासाठी, एक हाती दुजे पोटी जीवा ओढ खोपट्याची, चूल तीन दगडांची खापराचा तवा भांडी, असे तिची ही संपत्ती अठरा विश्वे दारिद्र्याची, भ्रांत

बघता बघता देवा -

लेखक विदेश यांनी बुधवार, 05/03/2014 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
कालपर्यंत कितीतरी खुषीत तू ठेवलेस - बघता बघता देवा, आज मात्र भुईत लोळवलेस . . हिरवेगार शेत सारे सोन्यासारखे पिकवलेस - बघता बघता देवा, सगळे का रे धुळीत मिळवलेस . . का रे देवा आम्हाला इतके तू छळलेस - बघता बघता देवा, पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . . घ्यायचे होते सगळे परत आधी इतके का दिलेस - बघता बघता देवा, आम्हाला कफल्लक का केलेस . . इतके दिवस तुझे कौतुक करायला लावलेस - बघता बघता देवा, आता बोट मोडायला लावलेस . . खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! .
काव्यरस

मी तुझा चंद्र झालो

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 04/03/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे. म्हणजे काहीच्या काही कविता आहे. त्यामुळे ह्या कवितेला "काहीच्या काही", "फालतू", "बंडल", "दर्जाहीन", "अभिरुचीहीन" यापैकी काहीही समजावे ;) - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मी तुझा चंद्र झालो.... केव्हा काय विचारतेस? तोंड धुता धुता हळू हळू मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही तेव्हाच...
काव्यरस

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 03/03/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.