तू
कधी तुझी याद....संधीप्रकाशात
आणि मग खळबळ....कुठेतरी आत
चिंब जणू तू....चिंब पावसात
ओला ओला शहारा....चिंब शरीरात
उरी काहिली काहिली....जरी चांदरात
होई काळीज निखारा....तुझ्या विरहात
मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात
आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात
कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात
तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात
कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात
दूर देशी तू....तरीही मनात
ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात
मिसळपाव