मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बघता बघता देवा -

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कालपर्यंत कितीतरी खुषीत तू ठेवलेस - बघता बघता देवा, आज मात्र भुईत लोळवलेस . . हिरवेगार शेत सारे सोन्यासारखे पिकवलेस - बघता बघता देवा, सगळे का रे धुळीत मिळवलेस . . का रे देवा आम्हाला इतके तू छळलेस - बघता बघता देवा, पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . . घ्यायचे होते सगळे परत आधी इतके का दिलेस - बघता बघता देवा, आम्हाला कफल्लक का केलेस . . इतके दिवस तुझे कौतुक करायला लावलेस - बघता बघता देवा, आता बोट मोडायला लावलेस . . खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! .

वाचने 2164 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अजय जोशी 06/03/2014 - 17:32
खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! छान....

विदेश 07/03/2014 - 08:45
जेपी, अ.आ., शिद, लीमाउजेट, निल्_वर्षाराणी, पाषाण्भेद, अजय जोशी .. सर्वांचे आभार .