मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

श्री. 420

बाजीगर ·
लेखनविषय:
उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-filed-against-uddhav-thackeray-shivsena-leader-anil-parab/articleshow/95369470.cms श्री. 420 (उद्धवांचा उजवा हात अडचणीत) " ये हाथ हमको दे दो ठाकूरे " अडचणीत बाळासाहेबांची लेकूरे !! सोमय्यांनी उगारला मोठा हातोडा दापोली रिसाॅर्ट अनधीकृत हा तोडा एस टी प्रकर्णी उद्दाम अनिल परब हादरले, सौमय्यांची त्यांना जरब कोरोना काळातील काळी कमाई लाँडरींग करुन बांधले रिसाॅर्ट साई महावसूली सरकारची जेलमधे संगत देशमुख,नबाब,राऊत,परब ची पंगत !

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव. कुणी म्हणे देतो वोट द्यावी एक नोट कुणी इथं दारूसाठी फिरे पाठी पाठी इमान हे होई थिटे जिथे वसे हाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. आपलीच भरी झोळी खुंटला विकास अंधाराचं राज आलं लोपला प्रकाश हपापल्या वादळाने गिळली हि नाव. भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. सत्तेची ही चढे नशा उफाळला माज गावच्या या डोईवर विनाशाचा ताज विकासाच्या मुळावर घालुनिया घाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

चाणक्य ·
लेखनविषय:
टिकली मंगळसूत्र जोडवी बाईचं बाईपण घराला घरपण रूढी परंपरा संस्कृतीचा हाकारा पोरीची जात सातच्या आत घरात दिवसाउजेडी बलात्कार तुझ्याच छातीचे उभार हसलीस, तर दुर्योधन चिडेल फसलीस, तर रावण पळवेल रेषेच्या आत सगळं काही चालेल रेषेच्या पलीकडे अग्निपरिक्षा लागेल तुझ्या नावानंच सगळे देतील शिव्या तुझ्या अंगी मात्र सोशिकपणा हवा आपले आदर्श महान आपली संस्कृती महान तुला दिलंय की आम्ही त्यात महत्वाचे स्थान तू देवीचे स्वरूप शिवाय भारतमातेचं रूप . . . वगैरे वगैरे चं बोचकं एकदा तुला दिलं की आम्ही मोकळे 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला

योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-dsp-vidya-sharma-demotion-to-lower-constable-post-post-when-find-gilty-a607/ वजीर केला प्यादा योगी आदित्यनाथांची सापशिडी डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई पोलीस डिएसपी स केला शिपाई सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी हवालदारपरमजीतसिंह रिपोर्टींग सर बक्कल नंबर-007 पावतीबूक सादर कर.

सांजावता दाटते का तुझी आठवण?

Deepak Pawar ·
काव्यरस
सांजावता दाटते का तुझी आठवण? जीवास या जाळते का तुझी आठवण? होते तुझे गोड ते लाजणे ही होते तुझे गोड ते हासणे ही गेल्या सुखा माळते का तुझी आठवण? वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे पर्णातुनी वाटते नांदती हे गंधापरी वाहते का तुझी आठवण? येती जशी पाऊले चांदण्याची होते कशी काहिली ही मनाची रातीस या भाळते का तुझी आठवण? दीपक पवार.

जगणे

सागरसाथी ·
लेखनविषय:
काव्यरस
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही. जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही. करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही. होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही. ----- अभय बापट ३१/१०/२०२२

शहरातले गाव

पाषाणभेद ·
रस्त्याने जातांना अचानक उंच इमारती डोंगर होतात त्यावरील काचेची तावदाने डोंगरावरील हिरवळ होते रस्त्यांच्या नद्या होतात त्यातून रहदारीचे पाणी वाहते जाणारी वाहने होड्या होतात बाजूची घरे शेतातली झाडे होतात त्यावेळी मात्र मी शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो - पाभे २१/१०/२०२२

दुपार

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

कुणा न कळता.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण. नुकता वसंत आला झाड झाड मोहरले नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण. भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर पळभर दूर होता का उठते मनी काहूर मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण. तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण. दीपक पवार.

कुण्या देशिचा असेल वारा??

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा, धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा. विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती? वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा.. सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा, थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा? किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची? रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा? घेऊन घागर, घाबरघाबर, घरून निघते पाणवठ्यावर; कुणी यौवना झरझर भरभर, तमाचीच वर ओढुन चादर. कुंडल, कंकण, बिंदी, पैंजण..