Skip to main content

कविता

बाई मी फुकट घेतला आराम!

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 30/08/2022 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रायोजित मधूचंद्र (?!) https://www.esakal.com/manoranjan/nayanthara-vignesh-shivan-honeymoon-s… No pain No Spain मधूचंद्र, विघ्नेश व नयनतारा नेटफ्लिक्स करणार खर्च सारा ना काही खर्च ना काम घरचं ना घेतलं कर्ज मधूचंद्री ही नवी संस्कृती कि नवी विकृती टिव्हिवर ते दंपति दिसणार प्रायोजक नेटफ्लिक्स झाले सर्व थेट फिक्स झाले ऐकोनी पोट धस्स असा खर्च अडीच लाख भाडे हाॅटेल बील काढे आम्ही म्हणतो पाढे अबबब नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम बाई मी फुकट घेतला आराम! बाई मी फुकट घेतला आराम !!

खेला होबे

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 25/08/2022 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-unive… शे बोल से खेला होबे, भाजपा बोल से एटा ना चोलबे .... काय म्हणत असतील स्वर्गात टागोर गुरुनाथ ? बघून कुलगुरु गेला आत !! कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य कोलकाटा शिक्षक घोटाळा होलघाटा शिक्षणाचा वाटोळा पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री तीन दिवस नोटा मोजती यंत्रे अटकेत मुखर्जी अर्पीता पार्थ सर्व क

आठवण....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 14/08/2022 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/50568/backlinks आमची बी एक आठवण... कविवर्यांची क्षमा मागीतली आहे. खिशातल्या रूमालाला घामाचा वास मनाला लागला तूझाच की ग ध्यास चार कप्प्यातला एक कप्पा होता खाली तू येणार म्हणून साफसफाई केली घरावरून मारल्या दिवसाच्या चकरा सात बात नाय बनली कारण जय विजय उभे दारात बांधीन म्हणलं सात तळाची माडी पण सावळ्या कुभांराची गाढवं मधी आली ऊगाच घेतला ध्यास डोक्याला कल्हई झाली चांदोबा नाय दिसला पण फुकट धुलाई झाली काय सांगू आता आठवणीत जगतो मनातले मांडे खाऊन रूमालाला घाम पुसतो कसरत १४-८-२२

आठवण

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 13/08/2022 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ---- अभय बापट
काव्यरस

जाणिवांची बाराखडी

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 13/08/2022 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????..... कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब..... कसा शमवता येईल शब्दांतून ???

श्रावण

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 29/07/2022 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार पाटीवर पांढरी शुभ्र रेघ ग्रीष्माच्या पाठीवर काळे काळे मेघ खरपुस ताबुंस मातीवर हिरवी चंद्रकळा प्राजक्ताच्या झाडाखाली मोतीयाचा सडा सुखावली धरती सुखावली मने इवल्या इवल्या रोपानी डुलती हिरवी राने चिंब झाले मन रुंजी घालतो साजण उभा भाऊ दारी म्हणे आला पंचमीचा सण मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी २९-७-२०२२

तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 27/07/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुला काय ठाऊक सजणी तुझ्यावर कोण कोण मरतंय आख्खं गाव तुझ्यासाठी रात्रंदिवस झुरतंय माळावरचा दगडू पैलवान भल्या-भल्यांना भरवतो हीव तुझ्यासाठी त्याचा सजणी टांगणीला गं लागलाय जीव सुताराचा चकणा म्हादू तुझ्यावर लईच मरतो तुला बघत पटाशीचं काम कानशीनं की करतो डोईवर घेऊन शेण-बुट्टी ठुमकत गं तू निघते दीवाण्यांची टोळी तुझ्या मागं मागं फिरते प्रत्येकाला तुझाच राणी गुलाम बनून रहायचंय तुला मात्र माधुरी बनायला म्हमईला जायचंय . आमची पेर्णा: . अवांतरः "डिसेंबर २

तू.....

लेखक चक्कर_बंडा यांनी मंगळवार, 19/07/2022 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
तू समोरून अलवार चालत यायचीस मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो काकणांची किणकिण कानाआड व्हायची मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा तू जराही वळून न पाहता निघून जायचीस मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा मी धीटपणे कधी पाहू शकलोचं नाही तुला आताशा तुझा चेहराही नीटसा आठवत नाही नाकातील चमकी मात्र चमकत राहते अधे-मध्ये आणि नुसताच गंध येत राहतो कडवट रानफुलांचा #चक्कर_बंडा
काव्यरस

एकदा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 19/07/2022 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा!

आठवणींचा पाऊस: रसग्रहण

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/07/2022 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा पाऊस: रसग्रहण सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते. रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो. अशा वेळी कवी म्हणतो: रात्रभर पडणारा पाऊस सकाळी नकोसा होतो कितीही हलका का असेना जेव्हा सतत बरसतो असा हा पाऊस कवीचा रात्रीचा सोबती असतो.