मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शहरातले गाव

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
रस्त्याने जातांना अचानक उंच इमारती डोंगर होतात त्यावरील काचेची तावदाने डोंगरावरील हिरवळ होते रस्त्यांच्या नद्या होतात त्यातून रहदारीचे पाणी वाहते जाणारी वाहने होड्या होतात बाजूची घरे शेतातली झाडे होतात त्यावेळी मात्र मी शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो - पाभे २१/१०/२०२२

वाचने 3603 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चित्रगुप्त गुरुवार, 10/27/2022 - 22:17
कोणताही अनुभव टोकाला गेला की कधीकधी असे काहीतरी झाल्याचे अनुभवाला येते, असे अनुभवी लोक सांगतात, तसे मलाही काही अनुभव आलेले आहेत, ते इथे लिहीण्याचा अनुभवही घ्यायला हवा, पण सध्या टंकाळा अनुभवत आहे.