तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते!

मरण!

"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

बीज

लेखनविषय:
काव्यरस
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

येते आठवण अधून -मधून ....

लेखनविषय:
काव्यरस
येते आठवण अधून -मधून , पहिल्या भेटीची , तहानलेल्या स्पर्शाची , तुझ्या नाजूक हातांची , अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची … येते आठवण अधून -मधून , पहिल्या चुंबनाची , निसटलेल्या ओठांची , तुझ्या डोळ्यातील आसवांची , अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….

मी अश्व!!

'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

पु . ल . तुमच्यासाठी!

लेखनविषय:
महाराष्ट्राचे लाडके दैवत मनापासुनी हा केला गौरव ‘आपुलकी’ ही साऱ्यांची उदंड केले प्रेम तुम्हावरी ‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली ‘खिल्ली’ कोटयानी उडवली ‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला ‘वंग-चित्रे’ ना साज चढवला ‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा ‘गणगोत’ सारे जमते तेव्हा ‘बटाटयाची चाळ’ असो वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’ ‘हसवणूक’ ही झाली न्यारी आम्हास वाटे ‘अपूर्वाई’ फळास आली आमुची पुण्याई शब्दरूपी हा खजिना तुमचा भाग्य आमुचे आम्हा लाभला अनंत या हो उपकारांची होऊ कशी मी उतराई ऋणात राहुनी तुमच्या मी सदैव ‘गुण गाईन आवडी’ – उल्का कडले (ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु.

चिरंतन भेट

लेखनविषय:
काव्यरस
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य

कविता ......!

लेखनविषय:
कविता ...... तुमच्या भावना अन कैक स्वप्ने तुमचे मोठेपण कि एकट्याने जीणे , ती सग्गळ कोरून घेते आणि तशीच बहरते ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … तुम्ही म्हणाल तेव्हाच जन्मते तुमच्या हाताने पूर्णविरामाबरोबर संपते शेवटच्या ओळीने , कधी प्रशंसा कधी टाळी तुम्ही घेता तिच्यासाठी कधी उसासा तर कधी विडंबन ती झेलेते तुमच्यासाठी ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … … तिचा प्रवास तीच करते कधी शब्दांमधून कधी भावनांमधून नाहीतर अस्फुट अशा स्वल्पविरामांमधून , तिचे नशीब तुम्ही घडवता आणि तुमचे ती , पण कविता

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी भारतात स्त्रीयांवर अन्याय क्ररण्याची परंपरा अतिप्राचीन काळापासून आहे. सीता व द्रौपदी यांचे उदाहरण सर्वांना माहीत असते. पण त्या पूर्वीही पार वेदकाळातही हे चालूच होते. बृहदारण्यकातली गोष्ट घ्या. गार्गी ही विद्वान ब्रह्मचारिणी. ऋषीमंडळात चालणार्‍या वादविवादात हिरीरीने भाग घेणारी. पण बिचारीवर एकदा दुर्धर प्रसंग ओढवलाच. याज्ञवल्काबरोबरच्या एका चर्चेत ती प्रश्न विचारत होती व याज्ञवल्क उत्तरे देत होता. तीचा शेवटचा प्रश्न होता "ब्रह्म कशात सामावते ?’ शिघ्रकोपी याज्ञवल्काने तिला दरडावले "गार्गी, अतिप्रश्न विचारू नकोस.

एक अशीही राधा !!

लेखनविषय:
एक अशीही राधा !! 'अनोळखी' म्हणून भेटला खरा 'आत्ताच ओळख झाली' म्हणाला खरा तिनेही मग तसेच सावरून घेतले कसे सांगू कसले ओझे मनावर घेतले !
Subscribe to कविता