बीज
लेखनविषय:
काव्यरस
ज्या बीजाला
अंकूरायचे असते
प्रसवायचे असते
ते पाहत नाही
तापमान किती डिग्री
हवेत आर्द्रता किती
पावसाची काही शक्यता
वा मातीचा ओलसरपणा
ते मातीत ढेकळात
खडकाच्या फटीत
इवल्या पालवीने उभारते
अस्तित्वाची दखल आपल्या
जगाला घ्यायला लावते
भोसले जी.डी.
आत्मशोध काव्यसंग्रह
वाचने
2123
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
तूमचा अभिप्राय काय आहे?
In reply to बीज by gsjendra
पटली नाही.
तम्ही म्हणता ती खरं असेल तर, वाळवंट का एवढी रुक्ष आहेत. झालंच तर अंटार्टिका वगैरे मध्ये पण झाडं उगवत नाहीत असं ऐकून आहे.
In reply to पटली नाही. by जव्हेरगंज
शब्दशः अर्थ घेऊ नये
भावना पोहचल्या.
-दिलीप बिरुटे
ही कविता तुम्ही परत दुसर्यांदा टाकली आहे!
परत तपासून बघा!
प्रगल्भ!
तुमच्या आयडीत a ऐवजी s चुकुन आला आहे का?
अरे काय चाललयं काय ?
हे आधीही इथे आहे की www.misalpav.com/node/35530
In reply to अरे काय चाललयं काय ? by जव्हेरगंज
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको तिथं लक्श देउ.
राम्याची शीतली तशीच राह्यली. ल्याह्यला घ्या तिच्यावरच एक लेखमाला.
होय दूसर्यांदा टाकली.a ऐवजी s चूकून झाले आहे.शब्दात अडकू नका
बीज