आज जिथे आहे सहरा
म्हणजेच वाळवंट,
रेग, सैफ़, बरचन
(म्हणजे काय हे गुगलून घ्या)
वगैरे भूवैशिष्टये असणारे,
तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो
(म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो
सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे
कोट्यावधि वर्षांपूर्वी)
सहस्र योजन विस्तार असलेले
ओलेचिंब, घनदाट, निबिड
रेनफॉरेस्ट!
रोज दुपारी दोनतीन वाजता
गड़गडाट करायचे
अजस्र काळेकभिन्न
क्युमुलोनिम्बस् !
अन् झरझर बरसायचे
जीवनामृतरस!
त्या विशाल निबिड़ जंगलात
होते अथांग एक सरोवर
शतशत योजन विक्राळ..
होत्या विशाल राक्षसी मगरी
आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज
आणिक होते चित्रविचित्र प्राणी
झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........
दिवसरात्र चालायच्या
अद्भुत निसर्गलील