Skip to main content

कविता

युरोप टूर

लेखक सुमेधा पिट्कर यांनी बुधवार, 13/07/2016 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे स्वप्न होते भेट द्यावी युरोपला 16.4.2016 ला तो सुवर्ण योग जुळुन आला "वीणा वर्ल्ड" तर्फे केली युरोपची टूर अद्भूत रम्य् देश, हिरवळ सर्व दूर प्रथम पाहिले लंडन शहर आखिव रेखिव स्वंच्छ सुंदर साहेबाचा देश पाहिला "लंडन आय" मधुन "कोहिनुर" मात्र नेला त्यांनी भारता मधुन वॅक्सचे पुतळे, थेम्स नदी आणि राजवाडा राणीचा युरोस्टा‍र ने उघडला दरवाजा फ्रान्स शहराचा जगातले एक आश्चर्य आयफेल टॉवर लूर म्युझियम, आर्च द ट्रॅम्प आणि कॉनकर्ड स्केअर लहान मुले होउन भेट दिली "डिस्ने लँडला" क्षणात होउन मोठे, गेलो "नाईट शोला" फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात श्रीमंत देश पण पॅरिस शहराचा पसंत नाही

उंबरा

लेखक हर्षल_चव्हाण यांनी बुधवार, 13/07/2016 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे, दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे? मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी, (पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी, "पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे, का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे? उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे... - हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

सरी..

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 09/07/2016 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्यासरीवर सरी आल्या की वाटते तु बरसावे असेच रीमझिम रीमझिम करावे हिरवेगार या ओसाड मनाला दरवळु द्यावा या देहाचा सुगंध मंद मंद हलका हलका बेधुंद करत जाणारा लख्खकन चमकावे तुझ्या तेजाने मी व्हावे सौदामिनी तु व्हावेस मुसळधार अन करावेस तृप्त या मनाला जन्मोजन्मी या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सुप्तेच्छा ही दडलेली तु शांत करावेस या कासावीस मना नवी संजीवनी देउनी मोहाचे धागे विणताना पडावा या जगाचा विसर नाती ही मनाची गुंफताना दु:खाची छाया ही व्हावी धुसर तु असेच बरसावे , बरसतच राहेवेस बळ द्यावे पुन्हा रुजावयाला या उन्मळुन पडलेल्या जीर्ण देहाला

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 09/07/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
काव्यरस

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/07/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

आठवतेय का?

लेखक रातराणी यांनी बुधवार, 06/07/2016 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतेय का? पावसातली पहिली भेट धुक्याची दुलई पांघरूण लपुन बसलेली वाट आणि तोल जाता जाता तू हाती घेतलेला हात ओल्या गवताळ मातीचा थंड हुळहुळता स्पर्श आणि भिजल्या पापण्यात तुझ्या श्वासांची ऊब मला उगीच असलेली घरी जायची घाई आणि तुझ्या आर्जवात शहारलेली जाईजुई डोळ्यांनीच दिलेघेतलेले कितीतरी मुके निरोप आणि परतीच्या वाटेवर हरवलेली दोन मनं आठवतेय ना? पावसातली पहिली भेट

झोका...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!!

लटकलेली समीकरणं

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 04/07/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
समीकरणाच्या एका बाजूला कधी कधी दुसरी बाजूच सापडत नाही ते असंच लटकत राहतं मग तिज्यायला म्हणजे कसं ना, की (a+b)^2 ला पत्ताच नसतो (a^2 + 2ab + b^2) चा आणि याचा त्याला पत्ता नसतो कुणीतरी सांगतं मग की बाबा (a+b)^2= (ab)^2 किंवा असच काहितरी आणि 'यालाच जीवन म्हणायचं' वगैरे मग सुरू होते एक फरफट... कधीमधी त्याला जाणवतंही की काहीतरी चुकतंय पण हाकत राहतो तो गाडी कारण, त्याला नीटसं समजत नसतं समीकरणच चुकतंय की आपण कधी भास होत राहतात त्याला समीकरण सुटल्याचे तर कधी स्वीकारली जाते ती असमानता कधी निद्रिस्त ज्वालामुखीसारखी खदखदत राहते ती आत. मला रविवारी सुट्टी असते . . . मला रविवारी दिसतात आरश्यात माझी काही
काव्यरस

हायकू (?)

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 03/07/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग

माझ्या मना....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मना हास जरा कालच्यापेक्षा आज बरा हाही दिवस संपून जाईल नवा उद्या घेऊन येईल आठवणींचे डोस कडू गिळत कुढत नको रडू नवा दिवस साजरा कर आयुष्यात आनंद भर डोळे उघड पहा नीट झटकून टाक सगळा वीट पुसून टाक रात्रीचे भास मोकळा कर दबलेला श्वास कानावरचे काढ हात आतल्या सुराला दे साथ आतला आवाज हाच खरा माझ्या मना हास जरा ऐक आता गाणीच गाणी गालावरचे पूस पाणी अन्यायाची सारी भुते जातील पळून कुठल्या कुठे नवी वेळ अशी येईल खतातून सोने होईल या उद्याचा विचार करा माझ्या मना हास जरा.