Skip to main content

कविता

सावली....

लेखक Jabberwocky यांनी शनिवार, 03/09/2016 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी सांगितल माझ्या सावलीला, जा तिला जाऊन भेटून ये. ती नाही भेटली तर, तिच्या सावलीशी बोलून ये. घट्ट मिठी मार तिला, थोडे अश्रूही गळूदेत खांद्यावर. तिलाही कळूदेत काय होत माझ, ती दूर दूर गेल्यावर. त्रास देउ नकोस तिला फक्त डोळे भरून पाहून ये. आणता आली तर तिची छवी, डोळ्यांत साठवून घेऊन ये. शांत बैस तिच्याजवळ, फक्त तिलाच बोलूदेत. येताना ते सगळे शब्द, कानात साठवून घेऊन ये. निघताना काही दिल तिने तर नको म्हणून सांगून ये. थोड प्रेम देऊन ये माझ, आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये… आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये…
काव्यरस

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/09/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
रवा आणि खसखस वेगवेगळे करायची शिक्षा भोगताना, सूक्ष्म नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहते मन जनामनातले साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

त्या दोघी.

लेखक अंतरा आनंद यांनी शुक्रवार, 02/09/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
त्या घरात दोघी बाया रहातात. एकीच्या पाठीवर पंख आहेत, तर दुसरीच्या पायात पैजण. दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात, ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात. पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर, तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर. दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात, एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात. घर बिचारं दमून जातं, पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा, पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं. दिवस मावळत येतो. पंख दमतात, पैंजण थकतात, दोघीजणी एकमेकींना सामोर्‍या येतात. पंखवालीला वाटतं, आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा; तर पैंजणवालीला वाटतो तिच्या पंखांचा हेवा. दोघींच गळ्यात गळ

मी .....

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 01/09/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी सूर्य.. मी रवि... मी दाह... मी अग्नि... विश्वाचा आधार मी जीवनाचा आकार मी प्रकाशाचा उगम मी श्वासातिल हुंकार मी सर्वस्वाचा पूर्णाकार मी तप्त जरी ... निराकार मी व्यापलेला अवकाश मी.... अन्... दाहाचा साक्षीदार मी चंद्राचा शीतल प्रकाश इंद्रधनूचा कोमलाकार तप्ततेचा स्वाहाकार मी एकटा... मी पूर्णाकार!
काव्यरस

माझीच मी...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 01/09/2016 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी.. लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे उसवता अलवार टाका उसवले माझीच मी सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी! © अदिती
काव्यरस

झाडावर पाखरू बसलं : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 28/08/2016 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

कोण?

लेखक मिसळपाव यांनी शुक्रवार, 26/08/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे? तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे? ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
काव्यरस

बैलांच्या जातीत

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 22/08/2016 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
वादळात सापडलेल्या गायी भरकटल्या नि पोचल्या स्वर्गात आळ घेतला गेला इंद्रावर जीवानिशी गेला ना तो! रानात उड्या मारत हुंदडणारी वासरे पोचली पडोसी मुल्क में मंग काय, झालं न बाप्पा युद्ध! पडोसी मुल्क तबाह! कासरे तोडून पळायचा प्रयत्न करते काळी कपिला वस्तीवरच्या वळूवर जडलाय तिचा जीव! जू फेकून पळून गेला चित्र्या हिरवाईने भूल पडून त्याला परत आणायचे उच्चस्तरीय प्रयत्न सुरु आहेत! बैलांच्या जातीत सध्या काहीच नाही आलबेल. - स्वामी संकेतानंद

जेवण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस की जेवण तयार आहे का.. आज मी जेवण तयार केलं नाही.. आज मूड नाही रे... महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत.. त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे.. अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे.. होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर अन ओटी पोटावर ओघळतोय, पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस.. ह्या बेधुंद संध्याकाळी.

मनाचा एकांत - ब्लड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/08/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या