Skip to main content

कविता

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

दिशा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा स्थापना तुझी करतात गणेशा पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा धांगडधिंगा अन सैराट वागणे लाज वाटत नाही लवलेशा कोठे चाललो आहोत आपण सारे कधी करणार विचार हे गणेशा तूच कर आता चमत्कार काही थांबव या मानवाच्या विनाशा ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता फाटून गेले कर्ण या कर्कशा नाही ठेवीत पावित्र्य सणांचे सापडत नाही यांना योग्य दिशा राजेंद्र देवी

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 13/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
cursor च्या सुईने inbox मधील पत्रे क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी हव्या त्या पत्राशी आल्यावर, अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत, blank page वर नजर खिळवून काय काय लिहून पाठवायचे परत याचे तासनतास जाळे विणतेच कि मन! . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी? शिवकन्या

श्रावणभुल

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणभुल एक शलाका नभास छेदून गेली तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली सारे रस्ते सजले फुलांनी श्वासात सारे वास मिसळून गेली ऊन सावलीचे खेळ खेळता श्रावणभुल पण हरखून गेली राजेंद्र देवी

आठवणींचा वसंत

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा वसंत वेळी अवेळी भासे मज चाहूल वाजे तुझे पैंजणांविना पाऊल लागताच तुझी चाहूल मम हृदयी भृंगारव झाला आठवणींची पाणगळ झडली फुटली पालवी चैत्राला शोभून दिसते गळ्यात तुझ्या पर्णफुलांची माला संपले बळ पंखातले नाही मिळाले घरटे या पाखराला काय नेणार बरोबर मज पुसशी नेणार मी या आठवणींच्या वसंताला राजेंद्र देवी

कामगार....

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार.... सायंकाळी रोजगार सारा गुत्त्यावर झोकुनी गेले घंटानाद करीती पुजारी परी देव अन दैव त्यांचे झोपुनी गेले मिटले डोळे सरणावरी घेणेकरी हात शेकून गेले वाहत्या नदीत राखेबरोबर कुंकू कुणाचे वाहून गेले वसूल करावयाचे म्हणुनी उरले सुरले तेराव्याचे जेवून गेले माय उपाशी, पदराआड पोर, ओठ त्याचे सुकून गेले राजेंद्र देवी
काव्यरस

मनात असावा सतत श्रावण....

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मनात असावा सतत श्रावण.... तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण जरी दीस असले ग्रीष्मातले..... राजेंद्र देवी

रहाटगाडगं.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/09/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत वाटतय.. सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.! रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला? बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!? हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला. असं का वाटत नाही? ? ? पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला! असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे. रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!

गौराई...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
गौराई... झाली तीच्या आगमनाची घाई आता जोडीने येईल गौराई दारी उमटतील पाउले कुंकवाची सुख शांती अन समृद्धींची सजतील लेऊन शालू भरजरी असेल मध्ये गणराया मखरी दोन दिसांची असेल माहेरवाशीण पंचपक्वान्नाचे असेल जेवण देता निरोप येईल डोळा पाणी गौराई माझी लाडाची गं राणी राजेंद्र देवी

दु:खाच्या वाटेवरचे गाव

लेखक शिवोऽहम् यांनी शुक्रवार, 09/09/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
वेदिका कुमारस्वामी यांच्या कविता सध्या वाचतोय फेसबुकवर. कविता नव्या आहेत, नव्या दमाच्या आहेत. दम कोंडणार्‍या आहेत. धग सोसवत नाही आणि तोंड फिरवायचीही सोय नाही. यापुर्वी इतकी घालमेल झाली होती तेंव्हा जिएंची राधी वाचून खाली ठेवली होती. का चंद्रावळ किंवा स्वामी? गळ्यात माझ्याच आतड्यांचे फास अडकवून अस्संच फरफटवत नेलं होतं ती गोलपिठ्यातली कुठली बरं कविता? की सगळ्याच? ही जिवंत कविता आहे. - ताजी, रक्ताळलेली, जाईजुईच्या काटेरी डोंगरांमधली, लुत भरलेल्या ओंगळ कुत्र्याची. हिरव्या रेषांच्या वाटांची, चमेलीच्या अंगाची. - आज्जीची, अम्माची, हेगडेची, भद्रा नदीसारखं हसण्याची, कॉफीच्या बियांची.