Skip to main content

कविता

!! यश !!

लेखक कवि मानव यांनी बुधवार, 05/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते, यशाचीही चव भलतीच न्यारी असते, ज्याने ती चाखली ती धन्य होतो, जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !! पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही, धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही, मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर, जगाला काबीज करणेही अशक्य नाही !! तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते, ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते, तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी, बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !! मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही, मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही, यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो, तो कधीच यशाच्य

गुपित

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 05/10/2016 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुपित थांब जरासा अजुनी अजून समईत वात आहे थांब जरासा अजुनी अजून चांदरात आहे कोमेजून जरी गेला चाफा कोमेजून जरी गेला गजरा थांब जरासा अजुनी रातराणी बहरात आहे उलटुनी गेला प्रहर रात्र संभ्रमात आहे थांब जरासा अजुनी चाहूल उदरात आहे राजेंद्र देवी

आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं...

लेखक वटवट यांनी मंगळवार, 04/10/2016 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते.... खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते... म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..? आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..? आता पान हललं कि पानगळ ठरलेली..

तू...

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 04/10/2016 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
आठवलीस तू धुसर धुसर, वेळ असे ती कातर कातर, स्मरता तुझ्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! तव नयनांचे घाव उराशी, अदा तुझी ती कातील कातील, स्तुती करावी काय सौंदर्याची, शब्द अपुरे पडतील पडतील !!२!! रूप तुझे भरपूर देखणे, त्यात लाजणे सुंदर सुंदर, तुझे हृदय जिंकण्यासाठी, हरून गेले बहु धुरंधर !!३!! पाहून तुझे लावण्य साजरे, माझी अवस्था मंतर मंतर, पाहताना तुझ मरण ही आले, त्यास विनंती नंतर नंतर !!४!!
काव्यरस

नव्या युगाची पहाट

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 04/10/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या युगाची पहाट आल्हाददायक तुझे आगमन दिनकरा, जसे आमचे बालपण तळपत असते माध्यान्य भास्करा, जसे आमचे तरुणपण मलूल असते संध्याकाळ दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण कापून टाक या किरणांनी मरिचया, संसाराचे हे मायाजाल घे कवेत मला हे अग्निरुप हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट करून टाक भस्म हा नश्वर देह अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट राजेंद्र देवी

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

मी ..... कोण ?

लेखक फिझा यांनी रविवार, 02/10/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी ..... कोण ? मी कोण तुम्ही कोण जन्माच्या वेळीच ठरवतात जात ,पात ,धर्म,देश ओळख तेव्हाच सांगून टाकतात ! 'मी' म्हणायच्या आधी "तू कोण " हे शिकवून टाकतात ! आधी होते बर मी यजुर्वेदी लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी, कुटुंबामध्ये आमच्या आहेत कोकणस्थही चार , बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार ! कॉलनीमधले मला 'मराठी' म्हणून ओळखतात शहरात इतर ठिकाणी फिरताना 'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ? शहराबाहेर गेले तर ही' पुण्याची ' असे म्हणाले लोक , परप्रांतात गेले तेव्हा 'महाराष्ट्रयीन' म्हणाले ते कैक .

सुगंधसय

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 02/10/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल चाहूल, सोनचाफा, मंद पाऊल, बकुळीला; तीट काजळीला, साजिरा प्राजक्त, आणि वाटेवर, आकाशमोगरा. त्याचा निवारा, चांदण्यात.. सुगंधसय, पाझरे मनात- गेली अत्तरे, कधीची उडून..

सगळं कस साधं सोप्प

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 30/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं कस साधं सोप्प एक घर, एक गाडी आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये एक मुलगी पण मुलगा पाहिजेच आणि बायको अन मी...

श्रावण...

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण... फेकून चादर काळोखाची सोनपावली उन्हे उतरली वारा शीळ घाली धरती नवचैतन्याने थरथरली पावसाच्या शिडकाव्याने हिरवी काचोळी भिजली लेऊन हार नवकुसुमांचा नवयोवना जणू हि सजली घेण्यास बाहुपाशात नभ टेकले क्षितिजा पलीकडे उधळीत सप्तरंग आकाशी इंद्रधनुकली हि अवतरली राजेंद्र देवी