Skip to main content

कविता

एक क: पदार्थ

लेखक शंतनु _०३१ यांनी सोमवार, 19/09/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी मी एक क: पदार्थ चंचल, स्वैर नि चिकित्सक, सौंदर्याच्या व्यर्थ व्याख्या, भावनांचे बेकार प्रवाह, आघात करताहेत कशावर ? कुणावर ? झीज, झीज, अपक्षय, अपक्षय, एक सुरुकुती, पांढरा केस, तिशी, चाळीशी हे दिसतं, जाणवतं, पण भावना त्या का पिकात नाहीत ?????
काव्यरस

हर हर महादेव !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 19/09/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा..... भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......! शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला.... लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ? आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा.... आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
काव्यरस

भास...

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 19/09/2016 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओलावत नाहीत पापण्या, भिजून जातात... तुझे-माझे-आपले क्षण नव्याने रूजून येतात... संधिप्रकाश पसरतो मनभर, आभाळभर... समुद्रही उसळतो स्वार होतो लाटांवर... दिसू लागतो एक पुल समुद्रात आकार घेणारा... जाणवतो एक स्पर्श हात हाती देणारा... भास कुठला हा की तो कळत नाही... नशीबाच्या मुर्ख रेषा काही केल्या जुळत नाहीत... उरतो उद्वेग, शरणागती... वर्षं वर्षं उलटून जातात तरी उरतात कशी नाती...

उरीचा घाव

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 19/09/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
छप्पन इंचाच्या ह्या 'उरी' भोसकली अठरा इंची सुरी बधिर मन ऐकून शब्दफुरफुरी मानवत नाही श्रद्धा अन सबुरी नेहमीच का आमच्या हातावर तुरी का सहन कराव्या ह्या कुरबुरी फोडून टाका तो जबडा आसुरी चमकवा तोफा, बंदुका, कुकरी माजवा हल्लकल्लोळ शत्रूच्या पुरी न ठेवावी कोणतीच मोहीम अधुरी होउदे जयघोष दाखवा बहादुरी लढाईच ही अछ्छी वा बुरी पुरे झाल्या हो त्या चर्चा संतुरी मागतो अखंड विजयाची कस्तुरी -संदीप डांगे
काव्यरस

दृष्टीकोन

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 18/09/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य सोपं असत.. तुझ्यासाठी अवघड का करू? मला नाही बदलायच; तुझ्याकडून अपेक्षा का ठेऊ? तो तसा... ही अशी... तक्रारीचा सुर नको... आपल मत आपल्यापाशी... त्याची कुठे चर्चा नको! सर्वांचच् आयुष्य सुंदर असत... प्रत्येकजण आपल्यापुरत जगत असत; एकमेकांशिवाय अडत नसत.. म्हणूनच.. अध्यात-मध्यात पडायच नसत!!!
काव्यरस

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

पण नाही होत ना असं!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 16/09/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू, फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू, मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून. पण नाही होत ना असं, जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! आपण म्हणावं, देण्यासारखं आहे काय?

मिठीतली रात्र

लेखक निनाव यांनी बुधवार, 14/09/2016 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे. "मिठीतली रात्र" आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत

दारी श्रावण दारी साजण....

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 14/09/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
दारी श्रावण दारी साजण.... पाऊस आला पाऊस आला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सरींवर सरी अशा कोसळल्या डोळ्याच्या कडा ढासळल्या असा काही बरसला श्रावण न्हाऊन निघाली तुझी आठवण रोज खेळते आठवणींची भातुकली वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली कळलेच नाही कधी ठाकला दारी श्रावण दारी साजण.... राजेंद्र देवी

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी