Skip to main content

कविता

स्वप्न मनाचे

लेखक माहीराज यांनी रविवार, 25/09/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य स्वप्ने मनी उद्याची पंख जरी हे इवले इवले, ध्येय गाठण्या आतुरलेले हृदयाचे पाऊल कोवळे.. तरूणपणाची चढता झालर मुक्त मनाला बसे ना आवर, स्वप्न कुठे अन मार्ग कुठे उगाच अंगी नसती पावर.. तिशी उलटता भरते अंगण गळ्यात पडते नसते बंधन, सांभाळताना नाती गोती करी स्वप्नांना दुरून वंदन.. वर्षा मागुन वर्षही सरते, स्वप्नांची ती यादच उरते, मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे पुन्हा नव्याने मनात भरते.. कसले स्वप्न नी कसली आस उगाच मनाचे सारे भास जीवन सुंदर जगण्याचा हा मात्र एक स्वच्छंद प्रवास...           -  महेश नायकुडे
काव्यरस

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

शब्दभूली

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 23/09/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक कधीतरी, तू उमलून येतेस. काळ वेळ न पाहता, राग लोभ न जाणता. पापणीतल्या पाण्यात कोणाच्या मुग्ध हास्यात, चुकार निवांत क्षणी कोण्या विस्कटल्या मनी. शब्दांचा आधार घेतेस तशी मौनातही बोलतेस उलगडतेस, तरीसुद्धा अलगद मिटू मिटू होतेस... तुझा सूर, तुझा नूर कधी फटकून दूर, गूज जीवाचे सांगण्या शब्द कधी महापूर. सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

होता का मानूस ?

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 23/09/2016 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान कोनाले काही व्हाचं आहे त कोनाले काही पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच मानूस व्हाले भेतात सगळे काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाही जाती धर्माच्या मांडीवर बिनधोक बसून दूध पिन्यासारखं मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे. सांगा आता - होता का मानूस ?

मनाचा एकांत - चिमण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

हेमलकसा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 22/09/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
हेमलकसा रंजले गांजले आदिवासी जमात त्यांची माडीया लुटुनी त्यांचे अनुदान अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या नक्षलवादाचा घेऊन संशय मांडला त्यांचा छळ जन्मताच ज्यांची ठेचली गेली नाळ जगण्यासाठी करती कसबसे मेळ वर्दीतील जनावरे करिती शरीराशी खेळ निबिड अरण्यात शिरला प्रकाशाचा एक कवडसा घेऊन मानवतेचा वसा गाव वसवले हेमलकसा अनाथ प्राण्यांसाठी काढले त्यांनी निवास बनले प्राणिमित्र गौरविले त्यांस भारतरत्न सहकारी भेटले सारे होते ध्येयाने भारलेली सहचरी पण अद्वितीय भुवरी देवमाणसे पेरलेली राजेंद्र देवी

श्रद्धांजली

लेखक निनाव यांनी बुधवार, 21/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धांजली लागावी कशी झोप आम्हा आत्ता कळले जेंव्हा - सरहद्दी वर वाहिले रक्त ते , आमुच्या शांत झोपे साठी होते! हसावे आम्ही कसे आत्ता, झालात तुम्ही हसत हसत हुतात्मा दोषी वाटते आम्हा आज गाफ़ील चारित्र्य आमुचे होते ! उठू आम्ही सर्व आत्ता लढू आम्ही वैरास बांधू आम्ही हा देश ऐसा पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !
काव्यरस

श्वास...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 21/09/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

रात्रवेड

लेखक पथिक यांनी मंगळवार, 20/09/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
घे तुझ्या पाकळ्यांत मिटून रात्री मला दे तुझ्या चांदण्यात मिसळून रात्री मला गूढ तुझ्या प्रांती विहरतो बैरागी वारा दे त्याच्या पंखावर बसवून रात्री मला विराट तुझ्या मौनाचा अथांगला डोह या अथांग डोहात दे बुडवून रात्री मला तुझ्या काळ्या मातीतून उगवतो उद्याचा सूर्य उद्या उगविण्यासाठी घे रुजवून रात्री मला

तू

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 20/09/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
अग्नीशलाका म्हणू तुजला की नवदुर्गेची ओळख तू झाशीवली राणी तुझ्यात चन्नमाची आठवणं तू सीता तू, द्रौपदी तू कुंती... गांधारी ती तू जिजाऊचा वास तुझ्यात माधवाची रमा ही तू तू न अबला... तू सबला कणखर मनाची..भाऊक तू तू आता न प्रवाह पतिता प्रवाहाचा मार्ग तू तुझ्या करी बळ सहस्त्रांचे मनी दयाभाव प्रेषितांचे निर्णयक्षम् आत्मा तुझा गे जगाचा एक आधार तू
काव्यरस