Skip to main content

कविता

न्युरोलॉजी हॉस्पिटल

लेखक निल्स्पंदन यांनी बुधवार, 19/10/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
न्युरोलॉजी हॉस्पिटल एक जागा जेथे क्षणाक्षणात परिस्थिती बदलते पेशंटची आणि साहजिकच नातेवाईकांची. वेटिंग रूम, एक अनोळखी लोकांचा परिवार एक जागा जेथे होत असते, ईमोशन्सची, परिस्थितिची देवाणघेवाण. चार वर्ष बेड वर असलेल्या ओंकार ची आई, वाट बघतेय, त्याच्या तोंडून एक शब्द ऐकण्याची. बाविशीतल्या तिवारीचे वडिल सर्वांसोबत आनंद व्यक्त करताहेत, त्याने तीन महिन्यांनी दिलेल्या थोड्याशा प्रतिसादाची. गावाकडचा नाले, देव नामाचा जप करतोय, आई कोमातून बाहेर येण्यासाठी. केअरटेकर विठ्ठल, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आणि चांगली कालजी घेतोय एका बाबांची. काय चूक त्या माऊलीची, जिला सांगितले होते की, तिच्या लेकराला फक्त खरच

थोडे अंतर...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 19/10/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी

अपहार...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 18/10/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी

दिसत जावं माणसानं

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/10/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही.

तू नाहीस ...

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 17/10/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू येणार नाहीस हे माहित असताना, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून, जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१! संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती, धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो, न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून, तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!! सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता, तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो, जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की, मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!! त्या रात्री झोप वैरी झाली होती, उघड्या डोळ्यांनी तुझ्या आठवणींच्या स्वप्नात बुडालो होतो, रात्रभर चमचमणाऱ्या तारे प
काव्यरस

नशीब...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 17/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब... जागोजागी फाटले नशीब किती ठिगळे लावू विरणावर काय काय भोगले हे न आठवे नाही विश्वास आता स्मरणावर आयुष्यभर रडत होतो कोण रडेल माझ्या मरणावर आजवर जळत राहिलो तरी टाकिती सरणावर राजेंद्र देवी

ओढ घरट्याची

लेखक माहीराज यांनी रविवार, 16/10/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे उडता आकाशी या    घरटे सुने सुनेच उरते.. परतीची ही ओढ लागता    तसे पाऊल मागे वळते.. कानोसा घेऊ राञ निघाली.. कात टाकुनी पहाट ही आली.. रानपाखरे घरट्यातुन या उंच भरारी घेऊ लागली... उन्हे दाटता डोक्यावरती  घरटे आतुर रडु लागले... डोळे शिणले वाट पाहुनी काळजीचे मग बांध ही फुटले... तु असा गेलास कुठे की हरवलास या वाटेवरती... शोधलास तु मार्ग नवा की विसरलास ही माझी प्रिती.....
काव्यरस

भांडण

लेखक वटवट यांनी रविवार, 16/10/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण.. भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण.. बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं.. भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...." चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..? आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..? अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...." बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र.. ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त.. उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त.. सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान.. मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान.. सांग...

हिरकणी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 16/10/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंत तो काळोखाने पूर्ण व्यापला होता रायगडावर अडकुन पडली सैरभैर ती माता मावळतीला गेला सूर्य बंद जाहली दारे दंडक होता शिवरायांचा शिस्त पाळती सारे कष्टकरी ती नार अपूर्व नाव जाणती हिरा गडाखालती राहत होती वाळूसरेतील घरा दूध विकाया रायगडावर ती मायमाऊली जाई उरकुन जाता काम रोजचे घरास परतुन येई एके दिवशी गड सोडण्या वेळ जाहला तिला उघडण्याला बंद ती दारे त्यांनी नकार दिला घरास होते बाळ तान्हुले कंठ दाटुनी आला राहावयाचे कसे लेकरु गलका मनात झाला भिरभिर फिरली रायगडावर शोधित तिथल्या वाटा उंच कडा एक दिसला जेथे ना पहारा फौजफाटा उतरु लागली मरणकडा तो बाळासाठी जीव तुटे खरचटला तो सारा देह तिला परंतु भान कुठ
काव्यरस

प्रश्न

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 15/10/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुला जर कधी काही प्रश्न पडलेच... उदाहरणार्थ, रात्र नेमकी किती मोठी असते अंधार म्हणजे काय त्यात नक्की काय आणि कसं बघायचं असतं धुक्यात आपला आपला रस्ता कसा शोधायचा अवेळी पाऊस कसा पडतो आणि त्यावेळच्या एकटेपणाचं काय करायचं लांबच लांब प्रवास न थकता कसा करायचा समांतर रेषा म्हणजे काय वगैरे वगैरे तर, . . . . . . तर मला विचार