मैत्रीण ....... !!!!
मैत्रीण ....... !!!!
माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना
तु चांदणे पाहत असतेस कदाचित ,
तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही
सारखेच आहेत म्हणे ....
ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही ....
ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ?
कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला
इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो
रापलेल्या इथल्या तृणांमधून तो,
वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो .......
'तो 'ढग तुझा होता;
ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ?
मिसळपाव