Skip to main content

दिवाळी

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 26/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय, अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे. जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे. धडधड डबे रिकामे होतायत.. सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत... "दोन किलो आहे, आईने सांगितलंय भाजणीवरच टाका" कशावर काय जातंय बघतच नाही काका, एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे, इकडून टाकलं कि तिकडून पसार, काकांची गिरणी लै फास्ट आहे, पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे? आपला डबा गिरणीत टाकायला काका उचलतायत असं पाहून एक ताई म्हणते, 'काका, लाडवाचं आहे बरंका, जरा जाडसर होऊ द्या" तिचा "...होऊ द्या" संपायच्या आत, पीठ डब्यात आलेलं असतं, वेड्या गृहिणीला वाटतं, जग जणू तिच्यासाठीच थांबलेलं असतं... - संदीप
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1804
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

ज ब र द स्त संदीपांन्ना एकदम ढगात लायटिंग कविता आवडली आहे !!!!

काय, पण काथ्याकुट धाग्यांनाही लागू आहे (एका दगडात अडीच पक्षी) डांगेअण्णा लै भारी.

:)

"दोन किलो आहे, आईने सांगितलंय भाजणीवरच टाका"
अगदी अशीच दिवाळीची सुरुवात व्हायची..