शैशव...
शैशव...
जे सुख लाभले शैशवास
पुन्हा ना लाभे मानवास
अन्न वस्त्र अन निवारा
ह्याचाच लागे ध्यास
कोठे हरवले ते निरागस
बालपण अन विश्वास
जसेजसे वाढू लागलो
वाढू लागला अविश्वास
जन्मताच काय तो घेतला
एक मोकळा श्वास
आता मात्र घुसमटतोय
प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास
राजेंद्र देवी
वर्गीकरण
दिवळीच्या सर्वांना शुभेच्छा...
In reply to दिवळीच्या सर्वांना शुभेच्छा... by राजेंद्र देवी
धन्यवाद :)
In reply to धन्यवाद :) by प्रचेतस
+१ शै शवी शिशुकाव्य.
छान आहे कविता