तू येता

लेखनविषय:
काव्यरस
तू येता फुलांत गंध रुतला पाना फुलांत रानवारा नाचू लागला कंपने उठली अधरांच्या देहावरी सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी अधीर रातीचा रंग परि हसला तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे चरणी दरवळे आभास स्पर्शांचे हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला ओंजळीत मी चांदणे घेऊनी तुझ्या रेशमी केसांत माळूनी झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला

..........पाठीशी नाही.

लेखनविषय:
काव्यरस
चालला मार्गावरूनी तो तोच माझा मार्ग आहे त्याच्याच पाठी चाललो मी तोच माझा दीप आहे दाखवी प्रकाश मजला राहुनी माझ्यापुढे पाठीचे संकट त्याने आधीच निवारलेले असे पाठराखण कशास हवी तो मार्गदर्शक असता जरी पाठच्या वारांची आता तमा न बाळगे मी तरी तव पावलावरी पाऊल ठेवुनी नि:शंक झालो मी उरी दर्शनाची आस माझी भागवी जन्मांतरी.

लॉन-वरचं लगीन!

https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे.

पानगळती

लेखनविषय:
जुन्यातला खाशा म्हातारा मेला तेव्हा स्मशानात फसफस करून काही क्षणात जळून गेलेला त्याचा मेंदू पाहून त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो लाकडाच्या ढिगाखाली कित्येक नव्या जुन्या आठवणी सोबत जळणारा त्याचा मेंदू पाहून निषेध केला मी सबंध पृथ्वीतलावरच्या भिकार तंत्रज्ञानाचा. त्याच्या मेंदूचं मेमरी कार्ड बनवून जुन्या आठवणी विकणारं दुकान या देशात अजून कुणी उघडलंच नाही. न्हवे, डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या सुटायच्या आधीच नवरा मेल्यावर त्याच्या अश्या कोणत्या आठवणीवर हौसा म्हातारी सत्तर वर्षे नांदली मला माहित नाही इथल्या गावगाडयातल्या पिढ्यानाही ते माहित नाही पण आयुष्यभर पुरुष स्पर्श न झालेला तिचा देह तडतड जळ

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

लेखनविषय:
काव्यरस
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित

आठवणी

आठवणी क्षणांच्या क्षणातील भावनांच्या भावनातील स्पंदनांच्या स्पंदनातील आवेगाच्या आठवणी पावसाच्या, पावसातील प्रवासाच्या, प्रवासातील गाण्याच्या गाण्यातील प्रेयसीच्या आठवणी थंडीच्या थंडीतील शेकोटीच्या शेकोटीतील हुरड्याच्या हुरड्यातील गोडीच्या आठवणी उन्हाळ्याच्या उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या सुट्टीतील पुस्तकांच्या पुस्तकातील जादूच्या आठवणी खेळाच्या खेळातील भांडणाच्या भांडणातील मैत्रीच्या मैत्रीतील ओलाव्याच्या आठवणी कधीकधीच्या आठवणी कुणाकुणाच्या आठवणी कशाकशाच्या साठवणी मनामनांच्या - संदीप लेले

वणवा

लेखनविषय:
ज्वाळा या वणव्याच्या, स्पर्शिती रान सारे बापाविना जन्मला हा, कोण त्यास आवरे.... भासती भ्रमितांना, मुखवटे हिरवळीचे धीरास जाण आहे, हे खेळ दिखाव्याचे.... बागडे पैलतीरी, पाहून आक्रोश बीज आहे तेथेही, आंधळा सत्यास.... उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे हृदयग्रंथी जपून, निवाराच अंत पाहे.... अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन.... मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची.... करुणा थोर आहे, फिकीर त्या जीवांची कल्पातही दुर्मिळ, प्रतीक्षा 'त्या' घनाची...

चारू-वाक १

लेखनविषय:
निद्रेपरी ना निद्रा, जागेपणी ना जाग मनास अशांत जुंपणे, कोण हा अभाग \\१\\ शक्यतेचा थांबवून शोध, मनास नुसती गवसणी मिळेल कोणसी माया, ना केलीस जरी मागणी \\२\\ ना करिसी, परी आपले बरे करिसी शक्य तरी शांती सूख पाविसी \\३\\ चाराचे होता एक गूण, पाहसी डोळ्यात डोळे दोन हरवले जरा पाहुणेपण, भेदास सार्‍या हरवून \\४\\ मधूर ते मिष्ठान्न , लोभ घेता मेळवून क्षोभ टाकावा झाकून, होतसे शांत चित्त मन \\५\\ नको करूस हाव, परी हवी संपन्नतेसी धावे ज्ञान-विज्ञान घेऊन पाव, देशो देशी जावे \\६\\ चारू-वाक २ नावारूपास यावे, आनंदे जगावे, साजेसे सजवावे, सुखी समाधानी व्हावे \\७\\ जनसागरी कोठे भेद, मेळवावे एकात
Subscribe to कविता