मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्लो डायग्राम---->माझ्या पावसाळी कविता॑चा

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या जुन्या पावसाळी कविता॑च्या कागदा॓ची शेकोटी कशी रसरसून पेटलीय ! पण ना धग ना धूर मग कुठले माझ्या डोळ्यात पाणी ? | | \/ मग कुठली पाण्याची वाफ? | | \/ मग कुठले वाफेचे ढग? | | \/ मग कुठला ढगातून पाऊस? | | \/ मग कुठली पावसाची कविता? | | \/ मग कुठले कवितेचे कागद? | | \/ मग कुठली कागदा॑ची शेकोटी | | \/ मग कुठला बेब॑द धूर अन कुणाच्या डोळ्यात अलोट पाणी? | | \/ मग.....मग....मग ------> उसळती वाफ?-----> गहिरा ढग?---->ओली कविता?----> भिजका कागद?---> विझती शेकोटी??????

वाचन 1685 प्रतिक्रिया 0