Skip to main content

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

लेखक रातराणी यांनी बुधवार, 14/06/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट. मग जनरली त्याच किंवा त्याच्या पुढच्या वर्षीच्या पावसातच भिजत भिजत कळवलेला नकार. मग थांबलेलं जग, कोसळलेला पाऊस अजून काय? हेच, हेच असतं ना पाऊस म्हणजे? पाऊस, प्रेयसी, आणि नकार कवितेचा टीआरपी डायरेक ढगात. श्या पुरे झालं आता, आपण तर नाही बाबा, असलं काही लिहिणार. किती पाऊस पडला तरी, न विसरता छत्री घेऊन जाणार. अहो किती झालं तरी, निसर्गातला एक ऋतू तो. नेमेची येणारा आणि, नेमेची रडवणार्या पावसाला मी आता वाकुल्या दाखवणारं. यंदाच्या पावसाळ्यात, पाऊस कसा ओव्हररेटेड आहे हेच मला सांगायचंय. पण त्यासाठी पावसावर कविताबिविता अजिबात नाही करणार!
लेखनविषय:

वाचने 4055
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तुम्ही पण पावसावर कविता केलीच की... अगदी पार, "अगं अगं न्हशी......" सारखी अवस्था बर्‍याच जणांची होते. बादवे, "अगं अगं न्हशी......" ही म्हण आहे, उगाच म्हशींचा अपमान करायचा आमचा हेतू नाही.

ते उगाच, अशा या पाऊसवेळी, तू नसता जवळी, किंवा पाऊस माझ्या मनीचा, तुझ्या डोळ्यांत झरेल का, वगैरे हळवं दवणीय वाचून असं हसायला येतं ना, वाटतं त्या कवीला गदागदा हलवून म्हणावं, जा ना बाबा कामं कर ना, तुम्ही मात्र तसं काही केलं नाहीत ते खूप आवडलं,