Skip to main content

कथा

जंटलमन्स गेम - १ - डॉलिव्हिएरा अफेअर

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 19/02/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अरलॉट गंभीरपणे आपल्या समोरील पत्रं वाचत होता. हिरव्या शाईने लिहीलेलं ते पत्रं शेकडॉ मैलांचा प्रवास करुन त्याच्या डेस्कवर येऊन पडलं होतं. पत्रं लिहीणारा सुमारे अठ्ठावीस - तीस वर्षांचा एक तरुण होता. आपल्या अंगी असलेल्या गुणांचं चीज व्हावं यासाठी आपल्याला एक संधी मिळवून द्यावी अशी त्याने अत्यंत विनम्र सुरात अरलॉटला पत्रातून विनंती केली होती! हे पत्रं म्हणजे एका अत्यंत वादळी प्रकरणाची नांदी ठरणार होतं! सोळाव्या आणि सतराव्या शतकात सर्व जगभर पसरलेल्या युरोपियनांनी व्यापाराच्या माध्यमातून हळूहळू आपली साम्राज्ये उभी करण्यास सुरवात केली होती.

अथ: केस कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 18/02/2015 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते.

खुशबू (भाग २)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 18/02/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ? काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज …… -------------------------------- ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती.

खुशबू (भाग १)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 17/02/2015 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे. गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकानं जिंकला.-----पेपरातली ही बातमी वाचता वाचता, खुशबूचे मन भूतकाळात मागे गेलं.

ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी'......एक लघूकथा. स्पर्धेसाठी नाही.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/02/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
Human Shadow on Divine Beauty... या गोष्टीचे नाव इंग्लिशमधे का आहे याचे उत्तर फार सोप्पे आहे. ज्या चित्रामुळे ही गोष्ट घडली त्या तैलचित्राचे नाव ब्रुनो फर्नांडिसने, म्हणजे ज्याने हे चित्र रंगविले होते, इंग्लिशमधे ठेवले होते. जे झाले ते लिहिले आहे त्यामुळे अलंकारिक भाषेला वाव नाही.....असो.... दिल्लीच्या नॅशनल आर्ट गॅलरीमधे देशातील अत्यंत प्रगल्भ अशा चित्रकारांच्या तैलचित्रांचे चित्रांचे प्रदर्शन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेली कित्येक वर्षे भरत आहे.

एक शोध.. एक गुण....

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/02/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लाहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फ़क्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण चिकटलेले नसते; त्यावयातले मित्र. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती. विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि पुढे हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने चार्टड अकाउंटेंसी सुरु केली होती; आणि आता तो सरकारचे अकाउंट्स बघत होता. मोठ्या पोस्टवर होता तो. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या लोनावळयाच्या घराचा कयापालट करून तेथे लॉजिंग बोर्डिंग सुरु केले.

'ति'ची गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 14/02/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
तो..... शनिवार नेहमीच्या सवईने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो. ती शनिवार 10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल.

मराठी कथा

लेखक पुस्तकमित्र यांनी शनिवार, 14/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, कविता असे विविध साहित्यप्रकार हाताळून आता तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक नवा विषय - मराठी कथा. आपल्या काही आवडत्या कथांविषयी ह्या धाग्यात बोलूया. जेणेकरुन मराठीतील काही उत्तमोत्तम कथांचा आढावाही घेता येईल. चला तर मग आपल्या आवडत्या कथांविषयी लिहायला.

दगडाचे सुप : एक भावांतरीत रशियन लोककथा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शुक्रवार, 13/02/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट. नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता.

अधूरी एक कहाणी

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 13/02/2015 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोड़ वैतागत... थोड़ आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले. एका कादंबरीच्या लेखनासाठी एक प्रकाशकाच्या आग्रहा वरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे लेखक महाशय थोड़े वैतागले होते; आणि त्यात सकाळीच दार वाजत होते. दार उघडल तर एक माध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडल जाताच ती तरातरा आत आली आणि एका खिड़कीच्या दिशेने गेली. जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकड़े टाकला.