Skip to main content

कथा

त्रिकूट - भाग १

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी बुधवार, 11/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चिवचिव" "चिवचिव" तिची तंद्री अखेर मोडलीच त्या आवाजाने. मान वेळावून न पाहता तिने तो आवाज पुन्हा ऐकला. हं! आल्या चिमण्या. रोजच येतात म्हणा. आणि रोजच आपण त्यांना खायला टाकतो. आज फरक फक्त इतकाच आहे की रोज ऑफिसला धावतपळत जायची घाई असते. धावतपळत?! स्वतःशीच हसली ती. रावी. तिचं नाव. एक नावाजलेली उद्योजिका. ती इंजिनीअर झाली तेंव्हाच ठरवून मोकळी झाली होती की आयुष्यभर कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करणार. सुरूवातीची काही स्ट्रगलची वर्षे सोडली की स्वतःची कंपनी सुरू करायची. तिच्या धडाडीने आणि गुणवत्तेने ते फारसं अवघडही नाही गेलं म्हणा तिला.

राँग नंबर - भाग ४

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/02/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक “हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ.

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 06/02/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती. आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.

राँग नंबर - ३

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/02/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : भाग १ आणि २ **************************************************************************************** “कर्रर्रर्र..क्क्क..क्कच्च्च्च्च्च…… भयाण वेगात आलेली ती झोंडा ’तरन्नुम’च्या दारात येवून कच्चकन थांबली तसा ’तरन्नुम’च्या सिक्युरिटी गार्डने खिशातला रुमाल काढून आधी घाम पुसला आणि मग घाबराघुबरा होत हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून अंतर्भागात डोकावून बघीतले. तसे आतल्या बाजुला उभा असलेला जाफर पटकन अजुन आतल्या भागात पळाला.

दोघी ……( भाग ४ )

लेखक फिझा यांनी गुरुवार, 05/02/2015 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ……( भाग ४ ) भाग ४ दुसऱ्या दिवशी बी एड कॉलेज चा पहिला दिवस छान पडला . आई आणि किरण रात्री जेवत असतानाच फोन वाजला . आता फोन वाजला कि आपसूकच किरण च्या अंगावर काटा यायचा . आता आदित्य चा आणि तिचा रीतसर बघण्याचा प्रोग्राम होईल त्याच संदर्भात फोन असेल असा उगीचच पटकन वाटून जायचं मनात . फोन वाजला तसं आई ने तिला घ्यायला सांगितला . " हेल्लो …." " हेल्लो , कोण किरण , मी बाबा बोलत आहे . " " ओह , बाबा ! कसे आहात ,आणि कधी येणार आहात . कधी संपणारे तुमची अष्टविनायकाची ट्रीप . या लवकर आता . " किरण वेगळ्याच उत्साहात बोलत होती .

राँग नंबर - २

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/02/2015 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्‍याचे हात सळसळायला लागले होते. कालच ७०-८० हजाराला बांबु बसला असल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घालायचे नक्की केले होते. तसेही त्यांचे अंतर्मन काही वेगळीच ग्वाही देत होते. आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडणार असलं की अशी फिलींग्ज यायची त्याला. नव्याने येणार्‍या अनामिक साहसाच्या कल्पनेने त्याचे बाहु स्फुरण पावायला लागले होते.

दोघी … (भाग ३)

लेखक फिझा यांनी बुधवार, 04/02/2015 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी … (भाग ३) भाग ३ पुढे काही दिवस लोटले . सुलभा आणि किरण भेटल्या नव्हत्या बऱ्याच दिवसात . फोनवरच एकदोनदा बोलणे झाले तेवढंच . एके दिवशी संध्याकाळी सुलभाने घरात आदित्य च्या लग्नाचा विषय काढला . तिने आदित्य ला आधीच किरण बद्दल विचारले होते . तेव्हा त्याने जरा लाजूनच 'पुढे जायला काही हरकत नाही' असे सांगितले होते . आई ने स्वतःच त्याला किरण बद्दल विचारल्यामुळे त्याला तर जणू मनातले ओठावर आले होते आपसूकच . अर्थात तो आई पुढे तसं दर्शवत नव्हता पण सुलभा ला ते कळल्यावाचून राहिला नाही . मग काय , किरण ला तर ती ओळखत होतीच आणि किरण ने आपली सून व्हावं असं तिला मनापासून वाटत होतं .

राँग नंबर - १

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/02/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
“इ है,,,इ है बंबई नगरीया तू देख बबुआ….” त्याने चादरीतुनच हात बाहेर काढला आणि सेलफोन उचलून चादरीच्या आत घेतला. यावेळी त्याला फोन करणार्‍या दोनच व्यक्ती होत्या एक तर औध्या नाहीतर सतीश. “च्यामारी पहाटे-पहाटे ९.३० वाजता उठवताना लाज कशी वाटत नाही या लोकांना? बोल बे सुक्काळीच्या… ” कावलेल्या आवाजात शिर्‍याने आधी फोनकर्त्याला दोन शिव्या हासडल्या. काल रात्री जुहूच्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये ७०-८० हजार घालवून झाल्यावर वैतागलेला शिर्‍या पहाटे दोन – अडीचच्या दरम्यान आपल्या लोखंडवालातल्या घरी पोहोचला होता. खिशाला चांगलाच बांबु बसलेला असल्याने तशी रात्रभर झोप नव्हतीच.

दोघी … ( भाग २ )

लेखक फिझा यांनी मंगळवार, 03/02/2015 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी … ! भाग २ हळू हळू दोघींची नितळ मैत्री घट्ट होत गेली ऱोजच्या रोज त्यांच्या गप्पा होऊ लागल्या , भेटल्या तर ठीकच नाहीतर फोनवर . आता किरण, काकूंना चक्क ' ए सुलभा' अशी हाक मारत असे . मैत्रीण झाली होती ना ! एके दिवशी अशाच एका संध्याकाळी सुलभा, किरण ची वाट बघत होती नेहमीच्याच टपरी वर . किरण आली तशी जरा नाराज वाटत होती . " चाल पटकन निघू आपण आज घरी लवकर जायचे आहे " किरण म्हणाली नाराजीने . " अग हो हो , माहितीये मुलगा येणारे पाहायला तुला . पण इतकी घाई ! आम्हाला नव्हता बुवा माहित एक माणूस इतकं उत्सुक आहे ते कुणालातरी भेटायला !! " सुलभा मिश्किल पणे हसत म्हणाली .

दोघी ……!

लेखक फिझा यांनी सोमवार, 02/02/2015 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ……! भाग १ रविवार सकाळ . फक्त आणि फक्त आराम करायची वेळ ! एखादी गझल ऐकायची किंवा आशा, लता आणि किशोर यांची बहारदार गाणी ! उडप्या कडून मस्त इडली सांबार मागवायचे , दुपारी एखादा मुव्ही पाहायचा ,संध्याकाळी नदीवर फिरायला जायचे ……असा परफेक्ट रविवार ! आणि आपला जोडीदार आपल्याबरोबर असेल तर आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण…… असा परफेक्ट ! जोडीदार …लाइफ़ पार्टनर ! ज्याच्याबरोबर आयुष्यातल्या प्रत्येक सुखाची कल्पना केलेली असते तोच ! आयुष्यात सुखाबरोबर दुख्ख हे असणारच पण त्यात खंबीरपणे आपल्याबरोबर उभा राहून साथ देईल ….