Skip to main content

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 12/11/2017 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला ? Making of photo and status : हा! हा!! हा!! ! नेटवर सर्फिंग करत असताना अचानक माझ्या नजरेस हे चित्र पडले. आणि मला खुद्कन हसू आले. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात येणारे विचार, आपली होणारी प्रतिक्रिया किती सुंदर तऱ्हेने ह्या चित्रात रेखाटलेय. जरा बारकाईने चित्रातल्या व्यक्तीकडे पहा बरं!, त्याने कसा हनुवटीवर हात ठेवलाय. त्या हाताला आधार द्यायला दुसरा हात पोटावर कसा आडवा ठेवलाय. त्याचे डोळे कसे गरगरल्यासारखे दिसताहेत. भुवया उंचावल्याहेत. आणि चित्र बघता बघता कसा तो उभ्याने मागच्या बाजूला इतका झुकलाय की आत्ता मागे पडेल की काय असं वाटतंय. पण कशाने झालीय त्याची ही दारुण अवस्था? तर समोरच्या भिंतीवरील चित्र पाहून झालीय. कल्पना अशी आहे की ती व्यक्ती आर्ट गॅलरीत एक चित्र प्रदर्शन पहायला आलीय, आणि फिरता फिरता ती व्यक्ती अशा एका चित्रापुढे येऊन उभी रहाते, की ज्या चित्रामध्ये फक्त गोल गोल रेषा, वाकडे तिकडे आकार, रंग आणि मधोमध एक मोठ्ठा टपोरा डोळा चित्तारलेला आहे. बरं, चित्रामध्ये कशाचा कशाशी संबंधसुद्धा वाटत नाहीए. चित्रामध्ये फक्त एक डोळा सोडला तर तिच्या ओळखीचं असं काहीही दिसत नाहीए. आणि असं चित्र पाहून ती व्यक्ती पुरती हबकून गेलीय, निराश झालीय. मॉर्डनआर्टसारखी काही चित्रे अशी असतात, जी समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असतात. ती समजायला दर्दी रसिक आणि त्यातील जाणकारच हवा. सामान्य व्यक्तीला असल्या चित्रात फक्त उभ्या आडव्या रेषा आणि रंग दिसतील. पण दर्दी आणि जाणकार व्यक्तीला त्यामध्ये जीवनाचे सार सापडेल. तर कधी त्यात त्याला विश्वरूपाचे दर्शनसुध्दा घडेल. हे चित्र पाहिल्याबरोबर मलाही असं वाटलं होतं, की त्या चित्रातली व्यक्ती मीच आहे. आणि समोरील भिंतीवरील समजण्यापलीकडचं असे चित्र पाहून माझीसुद्धा त्या व्यक्तीसारखीच अवस्था झाली होती. ह्या चित्रावर काहीतरी स्टेटस लिहिण्याची उर्मी माझ्या मनात उसळून आली. आणि मग मी लिहिले "च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला!?" Disclaimer : सदर लेखामध्ये 'मॉर्डनआर्ट' कलेला कोणत्याही तऱ्हेनं कमी लेखण्याचे लेखकाचे प्रयोजन नाही. --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
लेखनविषय:

वाचने 3542
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

क्लिप आर्ट गॅलरीत गेलात तर असे १७९७ फोटो सापडतील.. ५-६ वर्ष तरी मालिकेला मरण नाहीये. http://clipart-library.com/ तुम्ही स्वतः टिपलेले फोटो जास्त आवडतील वाचायला.

In reply to by बाजीप्रभू

@ बाजीप्रभू, फोटो आणि स्टेट्स मी तीनेक वर्षांपूर्वी लिहिले आहेत. आता मी त्यावर फक्त Making of photo and status लिहीत आहे. पुढच्यावेळी मी नवीन फोटो आणि स्टेट्स लिहीन तेव्हा मी स्वतः काढलेल्या फोटोंवर स्टेट्स आणि मेकिंग लिहिण्याचा माझा प्रयत्न राहील. मी प्रस्तावनेतील एक परिच्छेद खाली पुन्हा देत आहे. प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा.

गावडेजी, आवडाबाई, अमरेंद्रजी, सिरुसेरीजी, दिपकजी, अँड माय फ्रेंड कपिलमुनीजी गेले कुठे सगळे? मी प्रतिसादांची वाट पाहतोय म्हटलं!!

In reply to by दीपक११७७

@ दीपक११७७, आधीच्या भागात दिलेलाच प्रतिसाद मी खाली पुन्हा देत आहे. आधीच्या पाच सारखांच हा सुध्दा आहे >>> प्रतिक्रियेवरून नेमका अर्थबोध होत नाहीए. तरी मी माझ्या सोयीने अर्थ लावतो, की आधीच्या पाच सारखाच हाही चांगला झालाय. धन्यवाद!! :डोळा मारा:

In reply to by सतिश गावडे

@ सतिशजी गावडे, 'च्यामारी'ची फोड तुम्हालाही आवडली ना!!!? मलाही!!!! बादवे, च्या आणि मारी बिस्किटे माझीही फेवरेट हं!!! पण हो! खायला चहात बुडवली की पट्कन बाहेर काढायची, नाहीतर चमच्याने खावी लागतात. ग्लुकोज बिस्किटे पण अगदी तश्शीच! त्यांचा तर पुरताच चिखल होतो. कधी कधी तर ग्लुकोजची बिस्किटे चहात बुडवून तोंडात टाकता टाकताच हातातून गळून पडतात. आणि हे पाहुण्यांसमोर झालं की आपला पुरताच पोपट होतो. हो की नाही!!!? हा! हा!! हा!! प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!!

सचिन काळे, तुमचं हे विधान रोचक आहे :
बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा.
मग एखादं अनोळखी चित्रं कुणा रसिकाच्या मनात असंच क्लिक होऊ शकेल, नाहीका? प्रस्तुत लेख वाचतांना हा विरोधाभास (की साम्य?) पाहून माझीही त्या माणसासारखी अवस्था होऊ घातलीये. आ.न., -गा.पै.

@ गामा पैलवान, मग एखादं अनोळखी चित्रं कुणा रसिकाच्या मनात असंच क्लिक होऊ शकेल, नाहीका? >>> हो, नक्कीच सर!! सर, मी सांगू इच्छितो, की सदर लेखातील चित्र मला क्लिक झाले, चित्रातले चित्र नाही.

पण असो... चित्रातला मनुष्य एखाद्या सार्वजनिक शौचालयाच्या दरवाज्या बाहेर उभा असावा. आत गेलेला मनुष्य बराच वेळ बाहेर आलेला नसल्यामुळे झालेली पंचाईत त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते आहे. बघाबघा त्याची उभे रहाण्याची पध्दत नीट बघा. (त्याला दरवाज्यावरचे चित्र पाहायचे असते तर त्याचे डोके चित्राच्या बाजूला झुकलेले असते.) पोटातली कळ असह्य होते आहे म्हणून त्याने एक हात पोटावर दाबून धरला आहे आणि आता तो आतला मनुष्य बाहेर आला की पाहून घेतो त्याला असे रागीट भाव त्याच्या चेहर्‍यावर आहेत. ज्या अर्थी तो आतल्या मनुष्यावर इतका वैतागला आहे त्या अर्थी आतला माणूस "दोन मिनिटात येतोच" असे सांगत बाहेरच्या मनुष्याला फसवुन आत गेला असावा व किमान अर्धातास तो बाहेर निघाला नसावा. ज्या अर्थी आतला मनुष्य बाहेरच्या मनुष्याला फसवून आत गेला त्या अर्थी ते दोघे एकमेकांना चांगले ओळखत असावेत. कदाचित ते दोघेही एकाच कार्यालयात काम करत असावेत. बाहेरचा मनुष्य हा आत गेलेल्या मनुष्याचा वरिष्ठ असावा. म्हणुनच आतला मनुष्य बाहेर आला की त्याचा बदला कसा घ्यायचा याचा तो विचार करत आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@ पैजारबुवा, एकदम झक्कास लिहिलंय. द्या टाळी!!! आवडलं! आवडलं!! एकाच चित्रावर दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेकिंग लिहिलेले मिपाच्या वाचकांना नक्कीच आवडतील. आपणांस माझ्याकडून आग्रहाचे आमंत्रण आहे, माझ्या पुढील येणाऱ्या भागांवरसुद्धा आपण नक्की यावे आणि असेच झक्कासपैकी मेकिंग लिहावे. मी वाट पाहीन हं!!! साद घालायला लावू नका बुवा!!!