Skip to main content

जीवनमान

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 30/09/2019 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

१-जी

लेखक आजी यांनी सोमवार, 30/09/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नातवाच्या मते मी सेकंड, थर्ड वगैरे जनरेशनची नव्हे तर अगदीच फर्स्ट जनरेशनची आहे. म्हणजे १-G म्हणे. तो काय बोलतो त्याचं बरेचदा मला ज्ञान नसतं. तो माझ्या खोलीत येतो ते बिजनेस {मराठीत व्यापार डाव } खेळण्यासाठी. त्यात तो सरळ सरळ मला गंडवतो.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 25/09/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

ऑब्जेक्षनेबल..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/09/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो. आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?! पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे.

शेअर मार्केट क्लासेस

लेखक dadabhau यांनी शनिवार, 21/09/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल शेअर मार्केट क्लासेस चा खूपच सुकाळ झालाय. मी ही गेले वर्षभर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये... जवळजवळ फुकटात खूप लवकर अतिश्रीमंत होण्यासाठी अश्या क्लासेस चे बरेच सेमिनार ( eye opener वगैरे ...) अटेण्ड केलेत... so called अध्यात्मिक बाबा,बुवा ,देव्या.. आणि हे मार्केटगुरु ह्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये बरेच साम्य आढळले ( जसे टार्गेटेड market - मंदी च्या भीतीने आणि असे ही सदैव नोकरी गमावण्याची भीती वाटत असलेले IT वाले गिर्हाईकं ... सुरुवात ५-१० हजाराच्या module पासून करून हळूहळू लाखोंचे कोर्स गळ्यात मारणे ....