Skip to main content

जीवनमान

मानवा, ते येत आहेत!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 03/11/2019 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीयुत हिवाळा हे त्यांची मुलगी थंडी हिला घेऊन तावातावाने श्रीयुत पावसाळा आणि त्यांचा मुलगा पाऊस यांचेकडे आले तेव्हा पाऊस अंगणातच खेळत होता त्यामुळे थंडी घसरून चिखलात पडली आणि पाऊस तिला वाकोल्या दाखवत मित्रांसोबत खेळायला निघून गेला, तेव्हा श्रीयुत पावसाळा यांनी तिची क्षमा मागितली आणि दोघांना घरात बोलावले. श्रीयुत हिवाळा (चिडून): "अहो पावसाळा भाऊ, तुमच्या मुलाने या वर्षी हे काय चालवलंय? आम्हा दोघांना त्याने आमची वेळ आली तरी येऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे की काय?

समस्त लोकप्रतिनिधींनो

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

लेखक महामाया यांनी शनिवार, 26/10/2019 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर... एस-९ याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला... दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती... स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

फिट राहूया!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/10/2019 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आपल्यासोबत माझा एक नवीन उपक्रम शेअर करत आहे. तुम्हांला वाटते तुम्ही फिट आहात व आणखी फिट झाले पाहिजे? तुम्हांला वाटते तुम्ही व्यायाम केला पाहिजे? तुम्हांला आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करायचा आहे? आणि हे करताना त्यात काही अडचणी येतात, शंका आहेत? असं असेल तर तुमच्यासाठी एक सुंदर संकल्पना आणत आहे. अधिक फिट, अधिक निरोगी व सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी एक वाटाड्या आहे. आपली जर मनापासून इच्छा असेल तर मी आपल्याला स्वत:ची मदत करण्यासाठी मदत करू शकतो.

झोपा ग्राहक झोपा...

लेखक आजी यांनी मंगळवार, 15/10/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी महिला मंडळाच्या एका पिकनिकला गेले होते. रस्त्यात मी एक दुकान पाहिलं. त्यात अनेक वस्तू होत्या. वेगवेगळी मशिन्स होती. अननसाची सालं काढायचं मशीन, त्याच मशीनमधे त्याच्या गोल चकत्या सुद्धा होत होत्या. बटाट्याच्या चकत्या करायचं मशीन होतं. सुईत दोरा ओवायचं मशीन, पुढच्या १०० वर्षांचं कँलेंडर, सफरचंदाच्या कमळासारख्या पाकळ्या करायचं मशीन. काही विचारु नका. मला इतकी भुरळ पडली की मी हरखून गेले. तो विक्रेता प्रात्यक्षिक करुन दाखवत होता. पिकलेल्या टोमॅटोचे बाहेर रस न सांडता पातळ काप करुन दाखवत होता. त्याचं ते करणं म्हणजे मला अशक्यप्राय चमत्कार वाटत होता.

तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/10/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

टेक्नो सॅव्ही..

लेखक आजी यांनी सोमवार, 07/10/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे. जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला.

झोल? चच्चडी?

लेखक नूतन यांनी रविवार, 06/10/2019 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.